adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

केडगावमध्ये गॅस माफियांचा पर्दाफाश..!४१लाखांचा मुद्देमाल जप्त..गोदाममालक फरार.. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

 केडगावमध्ये गॅस माफियांचा पर्दाफाश..!४१लाखांचा मुद्देमाल जप्त..गोदाममालक फरार.. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई   सचिन मोकळं अहिल्यानगर (स...

 केडगावमध्ये गॅस माफियांचा पर्दाफाश..!४१लाखांचा मुद्देमाल जप्त..गोदाममालक फरार.. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.८):-केडगाव बायपास रोडलगत असलेल्या एका पत्र्याच्या गोदामात चालत असलेल्या गॅस रिफिलींगच्या धोकादायक आणि बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.यामध्ये तब्बल 41 लाख 26,339/रु.किमतीचा प्रचंड मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,चार आरोपींना अटक आणि गोदामाचा मालक मात्र फरार झाला आहे.दि.07 डिसेंबर 2025 रोजी स्थानीय गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की अनुराज टायर नावाच्या गोदामात गॅस टॅकरमधून थेट व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या रिफिलींग सुरू आहे.या माहिती नुसार श्री. कबाडी यांनी पोलीस अधिकारी हरिष भोये,अनंत सालुगडे यांच्यासह पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.पथकाने तत्परतेने छापा टाकत धोकादायक पद्धतीने रिफिलींग करणाऱ्या चार इसमांना रंगेहाथ पकडले.कृष्णा मधुकर दहिफळे,अदित्य सुनिल पवार,विश्वास त्रिंबक शिंदे,जनातुल शेख असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.चौकशीत त्यांनी कबुली दिली की त्यांच्याकडे कोणताही परवाना नसून,केवळ आर्थिक फायद्यासाठी एचपी गॅस टॅकरमधून बेकायदेशीर रिफिलींग चालू होते.छाप्यामध्ये 17 टन एचपी गॅस  ₹8,36,339/-

✔ एचपी गॅस टॅकर — ₹30,00,000/-

✔ 20 रिकाम्या गॅस टाक्या (भारत गॅस) — ₹60,000/-

✔ 5 भरलेल्या गॅस टाक्या — ₹22,500/-

✔ छोटा हत्ती टेम्पो — ₹2,00,000/-

✔ लोखंडी पाना — ₹500/-

✔ इलेक्ट्रॉनिक वजनकाटा — ₹5,000/-

✔ गॅस भरण्यासाठी 5 पाईप असलेले नोजल — ₹2,000/- या वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहे.या प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये खालील कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही मोठी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी हरिष भोये, अनंत सालुगडे, व पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, दिपक घाटकर, बिरप्पा करमल, राहुल द्वारके, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सतिष भवर, योगेश कर्डिले, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे, भगवान धुळे, अरुण मोरे यांनी केली आहे.

No comments