adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साने गुरुजी विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा

  साने गुरुजी विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा  विश्राम तेले  चौगाव प्रतिनिधी /रविंद्र कोळी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अमर...

 साने गुरुजी विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा 


विश्राम तेले  चौगाव प्रतिनिधी /रविंद्र कोळी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अमर संस्था संचलित पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाला नुकतेच 25 वर्ष पूर्ण होत असून या"रोप्य महोत्सवाचे" औचित्य साधून विद्यालयात 2003 ते 2020 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा "माजी विद्यार्थी" मेळावा  उत्साहात साजरा  करण्यात आला. कार्यक्रमाचं उद्घाटन अमर संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री मनोज भाऊ चित्रकथी  आणि चोपडा  नगर पालिकेचे प्रकल्प समन्वयक तसेच शाळेचे सदस्य श्री गणेश पाठक , वडती गावाचे सरपंच देविदास धनगर आणि वडती गावचे प्रथम नागरिक पोलीस पाटील आदरणीय श्री नवल भाऊ धनगर यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय दादासो संजय हरि जोशी यांनी केले.


या "माजी विद्यार्थी मेळाव्यात" जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता .आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत फेटे बांधून, पुष्पवृष्टी करून करण्यात आले. 'एक दिवसीय शाळा' साजरी करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात शाळेची सुरुवात राष्ट्रगीत, प्रार्थना आणि प्रतिज्ञेच्या  माध्यमातून करण्यात आली. शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांवर आदरणीय मुख्याध्यापक जोशी सर, चव्हाण सर, गुरव सर चेतन पाटील सर, चौधरी सर आणि पाठक सर यांनी विविध विषयांच्या तासिका घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यात  रुबियाना तडवी, रामचंद्र  कोळी, जितेंद्र शिंदे , विशाल शिंदे,  सरफराज तडवी,हर्षल सूर्यवंशी यास्मिन तडवी,राजेंद्र पाटील, शाकीर पिंजारी , किरण निनायदे, हिना तडवी, शकील पिंजारी सुलेमान तडवी, राधेश्याम कंडारे, शुभम तडवी, किशोर पाटील,  रोशनी तडवी  दीपक धनगर,  तय्यब तडवी, अक्षय कोळी या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि आपले अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. आलेल्या विद्यार्थ्यांच्या करमणुकीसाठी विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची करमणूक केली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सत्कारानंतर स्नेहभजनाचा  विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अनेक नृत्य प्रकारच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय  दादासाहेब श्री संजय जोशी सर तसेच श्री अतुल चव्हाण, श्री चेतन पाटील श्री राजेश चौधरी श्री  प्रशांत गुरव, श्री आर सी पाटील,श्री जगदीश पाठक, श्री अतुल धनगर, श्री विजय पालीवाल, श्री विनोद धनगर तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यात श्री विजय दीक्षित,  श्री लीलाधर महाजन,  श्री कैलास सुतार आणि शाळेतील आजी-माजी विद्यार्थी यांनी मोलाचे  सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश पाठक, श्री चेतन पाटील, श्री प्रशांत गुरव, आणि श्री अतुल धनगर   यांनी केले.

No comments