adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नागपूर येथील उपोषणावर दडपशाही करणाऱ्या अधिकारी ,आदिवासी मंत्री, गृह मंत्री यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदिवासी कोळी महादेव जमात बांधवांची निवेदनाद्वारे मागणी मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात उग्र स्वरूपाचे, जलसमाधी आंदोलन करण्यात येणार

 नागपूर येथील उपोषणावर दडपशाही करणाऱ्या अधिकारी ,आदिवासी मंत्री, गृह मंत्री यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदिवासी कोळी महादेव जमात ...

 नागपूर येथील उपोषणावर दडपशाही करणाऱ्या अधिकारी ,आदिवासी मंत्री, गृह मंत्री यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदिवासी कोळी महादेव जमात बांधवांची निवेदनाद्वारे मागणी

मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात उग्र स्वरूपाचे, जलसमाधी आंदोलन करण्यात येणार 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:- 10 डिसेंबर 2025 पासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू असलेलं उपोषण बेकायदेशीर व दडपशाही ने मोडून काढले त्या उपोषणाबाबत निषेध व दडपशाही करणाऱ्या अधिकारी, आदिवासी मंत्री, गृह मंत्री यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात समस्त आदिवासी कोळी महादेव जमात बांधव यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित महादेव कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी व ढोर कोळी अनुसूचित जमातीचा महामोर्चा 10 डिसेंबर 2025 रोजी विधान भवन हिवाळी अधिवेशन येथे आयोजित करण्यात आला होता. सदरहू आमच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे आम्ही सर्व आदिवासी कोळी जमात बांधव हे 10 डिसेंबर 2025 पासून उपोषणास यशवंत स्टेडियम येथे बसलेले होते.सदरहू आमच्या शिष्टमंडळाची चर्चा करण्यासाठी प्रशासन तथा लोकप्रतिनिधी यांच्याकडे वेळ नसल्यामुळे आम्ही या सर्व प्रशासनाचा व लोकप्रतिनिधीचा निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच लोकशाही मार्गाने चालू असलेलं उपोषण दडपशाही करून मोडून काढले आमच्या रीतसर मागण्याविषयी आपण प्रशासनाला व मंत्रालयाला अहवाल कळवावा असे निवेदनात नमूद करण्यात आले.आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बुलडाणा जिल्ह्यात उग्र स्वरूपाचे,जलसंमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा समस्त आदिवासी कोळी महादेव जमात बांधव बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला.

No comments