शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर चा खेळाडू चि स्पर्श अमोल तायडे याने पटकाविले सुवर्णं पदक अमोल बावस्...
शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर चा खेळाडू चि स्पर्श अमोल तायडे याने पटकाविले सुवर्णं पदक
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- दिनांक 11 डिसेंबर ते 14 डिसेंबर देवास मध्य प्रदेश येथे आयोजित शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर चा खेळाडू चि स्पर्श अमोल तायडे याने सांघिक प्रकारात सुवर्णं पदक पटकावले, त्या प्रसंगी मलकापूर चे मा उपविभागीय अधिकारी श्री संतोष शिंदे साहेब यांनी स्पर्श चा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, चि स्पर्श हा Msm इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी असून तो दररोज तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे सराव करतो. बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत त्याने वैयक्तिक प्रकारात रोप्य पदकाची कमाई केली केली होती,आपल्या यशाचे श्रेय तो प्रशिक्षक अभिषेक मानकर सर तसेच सॉफ्ट टेनिस असोसिएशन बुलढाणा चे सचिव श्री विजय पळसकर सर. आई वडील यांना देतो. क्रीडा क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे तालुका क्रीडा अधिकारी श्री लक्ष्मी नारायण यादव सर, चंद्रकांत साळूंखे सर, राजेश्वर खंगार सर,राहुल भाऊ तायडे, ऍड. स्नेहल तायडे,प्रा. डॉक्टर नितीन भुजबळ सर, क्रीडा शिक्षक श्री किशोर थटार सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते.

No comments