डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही समाजासाठी प्रेरक - माजी प्राचार्य डॉ जी पी पाटील इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भार...
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही समाजासाठी प्रेरक - माजी प्राचार्य डॉ जी पी पाटील
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून जरी प्रामुख्याने होत असली तरी बाबासाहेबांचे विविध क्षेत्रातले योगदान, सामाजिक सुधारणांसहितच कायद्याच्या चौकटीत राहून समाज उभारणीसाठी केलेले कार्य व 69 वर्षे उलटून गेल्यावरही समकालीन समाजाला प्रेरक असे विचार यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर अवघ्या भारतीयांसाठीच नव्हे तर विश्वासाठी प्रेरणादायी आहेत. 1936 साली झालेल्या फैजपूर येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनाचे फलित म्हणजेच स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याचे मूळ संकल्पना मांडली गेली व त्यातूनच जगातील विविध देशांच्या राज्यघटनेचा सखोल अभ्यास करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला आदर्शवत ठरणारी भारतीय राज्यघटना तयार करून देशासाठी मोठे योगदान दिले आहे. नव्या पिढीने बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून समाज व देशाच्या विकासासाठी मौल्यवान भूमिका पार पाडावी असे आवाहन तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर चे कार्यकारी मंडळ पदाधिकारी माजी प्राचार्य डॉ जी पी पाटील यांनी केले.
ते धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त आयोजित अभिवादन सभेत बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांच्यासहित प्राध्यापक l, प्राध्यापिका, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा डी बी तायडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्व अत्यंत साध्या, सरळ, सोप्या भाषेत सांगून त्यांनी केलेल्या विविध सुधारणा-कायदे किती प्रसंगीक आहेत यावर विवेचन केले. विविध विषयांचा सखोल अभ्यास , चिंतन आणि कठोर परिश्रमातून अवघ्या विश्वाला प्रेरक ठरलेली भारतीय राज्यघटना लिहून भारतासहित अवघ्या विश्वाला *ज्ञानाचे प्रतीक* म्हणून बाबासाहेबांची ओळख सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेतून त्यांचे विचार घराघरात-मनामनात पोहोचविण्याची जबाबदारी सर्व भारतीयांची असून तीच खरी आदरांजली ठरेल असे मत व्यक्त केले घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य प्रा डॉ मनोहर सुरवाडे, उपप्राचार्य प्रा डॉ हरीश नेमाडे, उपप्राचार्य प्रा डॉ कल्पना पाटील, राष्ट्रीय सण उत्सव समितीचे चेअरमन प्रा डॉ दीपक सूर्यवंशी यांच्यासहित प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.

No comments