श्री.व्यंकटेश नागरी पतसंस्थेतर्फे स्मशानभूमी स्थळी "अस्थी संरक्षक लॉकर"चे लोकार्पण विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
श्री.व्यंकटेश नागरी पतसंस्थेतर्फे स्मशानभूमी स्थळी "अस्थी संरक्षक लॉकर"चे लोकार्पण
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव: श्री व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे शहरातील चारही दिशेला असणाऱ्या स्मशानभूमी परिसरात आधुनिक सुविधायुक्त लोखंडी "अस्थी (जीव) संरक्षक लॉकर" चे लोकार्पण विविध समाजाचे अध्यक्ष व मान्यवर, पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत केले, व्हा.चेअरमन अजय वाणी, संचालक प्रवीण येवले, व्यवस्थापक किरण वाणी, ललित येवले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच धार्मिक परंपरांचा आदर राखत लॉकर सुविधा बसविण्यात आल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठोबा नामदेव माळी होते. याप्रसंगी गुलाबराव वाघ, जीवनसिंह बयस, व्ही टी माळी, भानुदास विसावे, सुनील जावरे, राजेंद्र पवार, कैलास माळी, नितीन चौधरी, आर डी महाजन, राजेंद्र जावरे, गणेश माळी, बाबुलाल पाटील, गणेश मराठे, उमेश महाजन, देविदास कुंभार, दशरथ बापू, सुरेश आप्पा, रविंद्र वाघ, गोविंद पुरभे, राजेंद्र वाघ, अजय वाघ, नंदा महाजन, युवराज माळी यांसह प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती व समाजसेवकांच्या हस्ते लॉकरचे उद्घाटन करण्यात आले. लोकार्पण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, जीव आणि अस्थी विसर्जनापूर्वी काळजीपूर्वक व सुरक्षितरीत्या ठेवण्यासाठी या लॉकरचे स्थापत्य अत्यंत उपयुक्त ठरेल. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा मिळावी हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. नवीन बसविलेले (लॉकर) पेटीला नऊ कप्पे पद्धतीने तयार करण्यात आले असून, सुरक्षितता, स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वधर्मीय नागरिकांसाठी ही सेवा आहे. समाजोपयोगी सुविधेच्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या श्री व्यंकटेश नागरी पतसंस्थेच्या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. लोकार्पण कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण वाणी तर आभार सुनील चौधरी यांनी मानले.

No comments