adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ध्येय निश्चिती शिवाय यश नाही - गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील यांचे मत समाजकार्य महाविद्यालय, चोपड्याचे हिवाळी ग्रामीण शिबीर उत्साहात संपन्न -

  ध्येय निश्चिती शिवाय यश नाही - गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील यांचे मत  समाजकार्य महाविद्यालय, चोपड्याचे हिवाळी ग्रामीण शिबीर उत्साहात संपन...

 ध्येय निश्चिती शिवाय यश नाही - गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील यांचे मत

 समाजकार्य महाविद्यालय, चोपड्याचे हिवाळी ग्रामीण शिबीर उत्साहात संपन्न -


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

        ध्येय निश्चिती शिवाय पर्याय नाही, विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात लवकरात लवकर ध्येय निश्चिती करून ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक असते. जितके जास्त मोठे ध्येय ठेवाल तितके यश मोठे मिळते असे प्रतिपादन चोपडा तालुका गट विकास अधिकारी नरेंद्र पाटील यांनी ग्रामीण शिबिराच्या समारोपप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले. भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा यांचे प्रथम वर्ष समाज कार्य स्नातक आणि प्रथम वर्ष समाजकार्य पारंगत या वर्गाचे ग्रामीण हिवाळी शिबिर  धनाजी नाना प्राथमिक आणि डी आर बी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सत्रासेन ता. चोपडा या ठिकाणी दिनांक 16 डिसेंबर 2025 ते  22 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. 


         यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका वंदना सरदार पावरा उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या सहसचिव श्रीमती अश्विनीबेन गुजराथी, उपाध्यक्षा छायाबेन  गुजराथी, संध्या गुजराथी, सोनल  गुजराथी, वैशाली सौंदाणकर, मुख्याध्यापक जगदीश महाजन, भालचंद्र पवार, प्रा.डॉ. अनंत देशमुख, शिबिर संयोजक प्रा.डॉ. राहुल निकम,प्रा.डॉ. मारोती गायकवाड, प्रा.डॉ. मोहिनी उपासनी आदी मान्यवर हजर होते. 

        कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रा.डॉ.राहुल निकम यांनी शिबिरादरम्यान शिवीरार्थींनी सात दिवसात केलेल्या विविध कार्याचा आढावा मांडला. अश्विनीबेन गुजराथी यांनी शिबिरार्थींना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. संध्याबेन गुजराथी यांनी शिबिरार्थींच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत महाविद्यालयीन जीवन मौल्यवान असल्याचे सांगितले. प्रा.डॉ. अनंत देशमुख यांनी शिबिरार्थींनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. प्रा.डॉ. मोहिनी उपासनी यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवल्याचे नमूद करत विजेत्यांचे बक्षीस देत कौतुक केले. यादरम्यान मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामीण सहभागीय मूल्यावलोकन अंतर्गत केलेल्या विविध कार्यांचा आढावा मान्यवरांसमोर सादर केला. पी आर ए दरम्यान केलेल्या कार्यांतर्गत शिवार फेरी, गाव इतिहास, सत्रासेन गावातील विविध कल्याणकारी संस्थाची माहिती, संसाधनांची माहिती, गावाची माहिती नकाशांच्या माध्यमातून उपस्थितांसमोर सादर केली आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

        राज पाटील, क्रांती बैसाणे, पूजा साळुंखे, ज्ञानेश्वर पाटील, महेंद्र साळुंखे, उज्वला देवरे, आशिक पावरा इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शिबिरातून खूप काही शिकल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीपा निकम यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.डॉ. मारोती गायकवाड यांनी केले. या शिबिराबद्दल समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौदाणकर, उप प्राचार्य प्रा.डॉ. आशिष गुजराथी, आश्रम शाळेचे सचिव ज्ञानेश्वर भादले, भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा पुनमबेन गुजराथी, उद्योगपती आशिष गुजराथी यांनी समाधान व्यक्त केले.

No comments