adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा आगाराच्या चोपडा-पुणे बसच्या ड्रायव्हर ला अहिल्या नगर बायपास रस्त्यावर सकाळी साडेचार वाजता अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

  चोपडा आगाराच्या चोपडा-पुणे बसच्या ड्रायव्हर ला अहिल्या नगर बायपास रस्त्यावर सकाळी साडेचार वाजता अज्ञात व्यक्तीकडून मारहाण  चोपडा प्रतिनिधी...

 चोपडा आगाराच्या चोपडा-पुणे बसच्या ड्रायव्हर ला अहिल्या नगर बायपास रस्त्यावर सकाळी साडेचार वाजता अज्ञात व्यक्तीकडून मारहाण 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 जळगाव विभागातील चोपडा आगाराची बस क्रमांक  एम एच १४ एल एक्स ८९४९ हि बस पुणे जाण्यासाठी रात्री साधारणपणे साडे आठ वाजता चोपडा आगारातून लालपरी हि बस रातराणी सुटते. सकाळी साधारणपणे साडे चार वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांची कार बसच्या पुढे आडवी लावली असता एसटी बसच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवला असता त्या चार लोकांनी दारूच्या नशेत असतांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार अहिल्या नगर बायपास वर घडला.सकाळ ची वेळ असल्याने बस मधील प्रवासी गाढ झोपेत होते. काय प्रकार चालू आहे हे कुणालाच कळले नाही. परंतु त्या बसमध्ये चोपडा येथील पत्रकार मिलिंद सोनवणे यांच्या लक्षात हा प्रकार आला असता तेवढ्यात ते अज्ञात व्यक्ती तेथून प्रसार झालेत. जेव्हा सर्व प्रकार लक्षात आले असता चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल रिसिव्ह केला नाही. जर परिवहन महामंडळाच्या बसेस वर असा जीवघेणा हल्ला दारू पिऊन अज्ञात व्यक्ती हल्ला करत असेल अनं उद्या समजा प्रवा़शांवर काही अनुसूचित प्रकार घडला असता याला जबाबदार कोण? 

असा प्रश्न बसमधील प्रवाशांनी उपस्थित केला. म्हणून सर्व प्रवासी यांनी जवळ च्या पोलीस ठाण्यात बस नेवून अज्ञात व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल केला व पुढे पुण्याकडे दुसऱ्या दिवशी हि बस सुखरूप संध्याकाळी पोहचली. 

No comments