अहिल्यानगर कम्युनिटी हेल्थ सेंटर नव्या ठिकाणी स्थलांतरित; अल्पदरात दर्जेदार उपचारांची हमी.. “गरीब रुग्णांना परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा ...
अहिल्यानगर कम्युनिटी हेल्थ सेंटर नव्या ठिकाणी स्थलांतरित; अल्पदरात दर्जेदार उपचारांची हमी..“गरीब रुग्णांना परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा संकल्प कायम” लक्ष्मण पुजारी
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१६):-गरीब,श्रमिक, स्थलांतरित मजूर तसेच समाजाच्या तळागाळातील घटकांसाठी दिलासा ठरणारे अहिल्यानगर कम्युनिटी हेल्थ सेंटर आता अधिक सुसज्ज आणि सोयीस्कर ठिकाणी कार्यरत झाले आहे.स्नेहालय संस्था आणि श्यानडार इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन २००७ पासून सुरू असलेले हे आरोग्य केंद्र सावेडी परिसरातील श्रमिक बालाजी नगर येथील ‘प्रेम कॉर्नर’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे.या नव्या वास्तूचे उद्घाटन लॉरिड्ज न्युडसन कंपनीचे प्रमुख लक्ष्मण पुजारी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना श्री. पुजारी यांनी “अहिल्यानगर कम्युनिटी हेल्थ सेंटर हे केवळ उपचार केंद्र नाही, तर समाजाच्या शेवटच्या घटकासाठी माणुसकी, विश्वास आणि आशेचे प्रतीक आहे. गरीब रुग्णांना अल्पदरात दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, या उपक्रमाला आमच्या कंपनीकडून यापुढेही भक्कम सहकार्य दिले जाईल,”असे ठामपणे सांगितले.
चार वर्षांत जवळपास ३० हजार रुग्णांना दिलासा
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत स्नेहालयच्या सचिव डॉ.प्रीती भोंबे यांनी सांगितले की,स्नेहालय संस्था आरोग्य,शिक्षण आणि सामाजिक पुनर्वसन या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे.त्याच ध्येयातून या आरोग्य केंद्राला अधिक सक्षम स्वरूप देत नव्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.गेल्या चार वर्षांत या केंद्रामार्फत २९,८५७ रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यात आली असून,यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगार,स्थलांतरित मजूर,गरीब कुटुंबे,झोपडपट्ट्यांतील नागरिक तसेच ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे.
दर वाढ नाही;सेवा अधिक सुसज्ज
स्नेहालयचे संचालक हनीफ शेख यांनी स्पष्ट केले की,नव्या वास्तूमुळे सुविधा वाढल्या असल्या तरी तपासणी शुल्क पूर्वीप्रमाणेच अत्यल्प ठेवण्यात आले आहे.यामुळे गरजू रुग्णांवर आर्थिक बोजा न पडता दर्जेदार उपचार मिळणे शक्य झाले आहे.
खर्चिक रुग्णालयांना परवडणारा पर्याय
श्यानडार कंपनीचे मेडिकल ऑफिसर डॉ. ऋषभ फिरोदिया यांनी सांगितले की, नगरमधील महागड्या खासगी रुग्णालयांतील खर्चिक तपासण्यांना हे केंद्र एक प्रभावी पर्याय ठरत आहे.
येथे तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, अत्यल्प दरात ईसीजी, एक्स-रे, फिजिओथेरपी,तसेच सवलतीच्या दरात सर्व प्रकारच्या लॅब तपासण्या उपलब्ध करून देण्यात येतात.यावेळी स्नायडर कंपनीचे माजी प्रमुख आणि स्नेहालय संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक अरविंद पारगावकर यांनी,या आरोग्य केंद्राच्या सुविधांची माहिती अधिकाधिक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
संपर्क 📞 ९०११११३८२० संगीता सानप (स्नेहालय अधिकारी)

No comments