डॉ. नीलभ रोहन हिगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तर सौरभ कुमार अग्रवाल वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ! संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. (संपादक...
डॉ. नीलभ रोहन हिगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तर सौरभ कुमार अग्रवाल वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक !
संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना नागपूर येथील नागरी हक्क संरक्षण दलाचे पोलीस अधीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची वर्धा जिल्ह्यातून तडकाफडकी बदली झाल्याचे समोर आहे. त्यांच्या जागेवर वर्धा पोलीस अधीक्षक म्हणून नव्याने सौरभ कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ कुमार अग्रवाल हे यापूर्वी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक म्हणून तर त्यानंतर पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तर हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकृष्ण कोकाटे यांचीही नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागेवर डॉ. नीलभ रोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. नीलभ रोहन यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवादी विरोधी पथकांचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तेथे तेथेही त्यांनी नुकताच पदभार घेतला होता. त्यानंतर त्यांची हिंगोलीत पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. पोलीस अधीक्षक या पदावर त्यांची पहिल्यांदाच नियुक्ती असल्याची माहिती समोर आहे. डॉ. श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली पोलीस अधीक्षक म्हणून 14 ऑगस्ट 2024 रोजी पदभार स्वीकारला होता जिल्ह्यात चांगली कामगिरी बजावली आहे. हिंगोली नगरपालिका निवडणुकीच्या काळातच त्यांची बदली होणार असल्याची चांगलीच चर्चा होती. मात्र निवडणुकीमुळे त्यांच्या बदलीला ब्रेक लागला होता. मात्र मतमोजणीच्या दुसऱ्याच दिवशी सोमवार (ता. 22) त्यांच्या बदलींचे आदेश धडकले आहेत. आजच्या बदल्या झालेल्या आदेशात अधिकाऱ्यांना आपल्या नव्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

No comments