महाराष्ट्र पोलीस खात्यात 40 ते 50 पोलीस अधिकाऱ्यांच्या शनिवार पर्यंत होणार बदल्या:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ! संभाजी पुरीगोसावी ( मुंब...
महाराष्ट्र पोलीस खात्यात 40 ते 50 पोलीस अधिकाऱ्यांच्या शनिवार पर्यंत होणार बदल्या:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !
संभाजी पुरीगोसावी ( मुंबई ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एकाच जिल्ह्यात तीन वर्षाहून अधिक काळ राहिलेल्या त्या सुमारे 45 ते 50 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या शनिवार पर्यंत केल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 16 डिसेंबर रोजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून तातडीने अशा पोलीस अधिकाऱ्यांची माहिती घेणार आहेत. यामध्ये दोन वर्ष पूर्ण झालेल्या अप्पर पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, अशा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त एकाच आयुक्तालयात तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या उपनिरीक्षकांपासुन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जांच्या पोलीस अधिकाऱ्यांचीही माहिती घेणार आहेत. यामध्ये नवी मुंबई पुणे ठाणे पिंपरी चिंचवड नाशिक नागपूर पोलीस आयुक्ताकांसह सहाय्यक पोलिस आयुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस महानिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त अशा 45 ते 50 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात 28 पोलीस उपायुक्त आहेत तर आठ पोलीस आयुक्त आहेत सुमारे 13 पोलीस अधीक्षक असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सुमारे 22 पोलीस उपायुक्त यांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही त्यांच्या अद्याप बदल्या झाल्या नाहीत. शिवाय 10 ते 12 पोलीस महानिरीक्षक यांना पदोन्नती देवुन बदल्या केल्या जाणार आहेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर सदानंदा ते पोलीस महासंचालक असतील नवीन पोलीस महासंचालकांचा काही पोलीस आयुक्तांनी चांगलाच धसका घेतला आहे. काही उपायुक्तांनी थेट पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना क्रीम पोस्टिंगसाठी साकडे घातले आहे. शुक्ला यांच्यामार्फत आपली वर्णी लागण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खांस सूत्रांनी सांगितले आहे.

No comments