जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धेत बाल संस्कारची सानवी गडे प्रथम भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : - जळगांव जिल्हा...
जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धेत बाल संस्कारची सानवी गडे प्रथम
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : - जळगांव जिल्हा मुख्याध्यापक संघ, जळगांव आयोजीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धेत गट प्रथम मधे " माझे उद्याचे स्वप्न " या विषयावर वकृत्व स्पर्धेत बाल संस्कार विद्या मंदीर यावल ची इयत्ता सातवीची विद्यार्थीनी कु. सानवी पंकज गडे हिने उत्कृष्ठ वकृत्व करून जिल्ह्यातुन प्रथम गटातुन प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला. जळगांव येथील ए. टी. झांबरे विद्यालयात झालेल्या स्पर्धेत जिल्हा भरातून सर्व तालुक्यां मधुन प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सानवी गडे हिने परखड पणे आपले विचार मांडून सर्व परिक्षकांचे व उपस्थितांचे मन जिंकले व प्रथम क्रमांक पटकावला.
या यशात तीला शाळेचे शिक्षक प्रशांत महाजन, वडिल प्रा.पंकज गडे,आई सुवर्णा गडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तीच्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी, मुख्याध्यापक सुनिल माळी, संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.

No comments