adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याची तक्रार प्राध्यापकाच्या नोकरीवर कारवाईची टांगती तलवार

 दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याची तक्रार प्राध्यापकाच्या नोकरीवर कारवाईची टांगती तलवार  दिनेश भोळे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता भुसावळ ...

 दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याची तक्रार प्राध्यापकाच्या नोकरीवर कारवाईची टांगती तलवार 

दिनेश भोळे
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता

भुसावळ प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यामुळे भुसावळ येथील पी.ओ. नाहटा कॉलेजमधील सहयोगी प्राध्यापिका डॉ. ममताबेन सी. पाटील यांच्यावर कारवाई करून याबाबतचा अहवाल विद्यापीठाकडे सादर करावा, अशी शिफारस उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. पराग मसराम यांनी केली आहे. कारवाईचा अहवाल विद्यापीठाकडे सादर करावा; अन्यथा होणाऱ्या परिणामास संस्था जबाबदार राहील असेही नमूद केले आहे. ताप्ती एज्युकेशन सोसायटीच्या भुसावळ येथील पी. ओ. नाहटा महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. ममताबेन सी. पाटील या शासन सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांना तीन अपत्य होती तरीही संस्थेने त्यांना नियमबाह्य नियुक्ती दिल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी ७नोव्हेंबर २०२४ रोजी उच्च शिक्षण संचालनालय पुणे, कवयित्री बहिणाबाई विद्यापीठाचे कुलसचिव व विभागीय सहसंचालकांकडे केली होती. प्रा. पाटील ह्या १६ जून २०११ पासून शासन सेवेत असून सेवेत रुजू होण्याआधी त्यांना दोन जुळी मुले व एक असे एकूण तीन अपत्य आहेत. त्यानुसार त्या २८ मार्च २००५ च्या शासन निर्णयाप्रमाणे अपात्र ठरतात. विशेष म्हणजे त्यांनी लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्रात नमुना 'अ' मध्ये लेखी दिले आहे कि, त्यांना १४ ऑगस्ट २००४ रोजी दोन जुळी मुले व नंतर १५ मार्च २००९ रोजी एक मूळ अशी तीन अपत्य हयात आहेत. २८ मार्च २००५ व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अपात्र ठरविण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे. याबाबत २५ सप्टेंबर २०२४ रोजी स्वतःच्या स्वाक्षरीनिशी लिहून दिल्याचा पुरावा उपलब्ध असल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. सदरील प्राध्यापिकेने २०११ पासून शासनाचे लाखो रुपये वेतन मिळवलेले आहे. नाहटा कॉलेज संस्थेने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून वेतन वसुली व बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत केली आहे. या प्रकरणाकडे समस्तांचे लक्ष लागून आहे.

समितीचा निष्कर्ष

या तक्रारीच्या अनुषंगाने विद्यापीठाने व्यवस्थापन सदस्य डॉ. संजय सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती. समितीच्या चौकशीत प्रा. डॉ. पाटील यांच्या भरतीवेळी संस्थेने युजीसी, विद्यापीठ व शासन निर्णय परिपत्रकांचे पालन केलेले नाही, संस्थेने प्रा. पाटील यांच्याकडून अर्ज करतेवेळी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र भरून घेणे आवश्यक होते त्याचे पालन केलेले नाही, प्रशासकीय कामात अनियमितता त्याचप्रमाणे विद्यापीठामार्फत संस्थेने उमेदवाराच्या सादर केलेल्या कागतपत्रांच्या आधारे तसेच समितीने केलेल्या शिफारशीनुसार व्याख्याता मान्यता विभागाने शिक्षक मान्यता दिलेली असल्याचे चौकशी समितीला आढळून आल्याने या प्रकरणात कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

No comments