अनैतिक संबंधाचा संशय पत्नीचा खून, वालचंदनगर पोलिसांनी आरोपी पतीला जेजुरीत ठोकल्या बेड्या! खूनाचा गुन्हा उघडकीस ! संभाजी पुरीगोसावी (पुणे ...
संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर पोलीस ठाणेच्या हद्दीतील शेळगांव गावातील सौ.मनीषा मल्हारी खोमणे (वय 35) या महिलेचा मंगळवारी पहाटेच्या सुमारांस पती मल्हारी (उर्फ बापू ) खोमणे यांने डोक्यात लाकडाने जबर प्रहार करून पत्नीचा खून केला. घटनाक्रनंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून धूम ठोकली होती. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता राहत्या घरी मयत महिला या अंघोळीसाठी जात असताना पाठीमागून आरोपी पतीने तिच्या डोक्यात जोराचा जोराचा प्रहार केल्याने ती जागीच मृत्युमुखी पडली. घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुगणे पोलीस उपनिरीक्षक रथीलाल चौधर पोलीस हवालदार दादासाहेब डोईफोडे पोलीस कर्मचारी गुलाब पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आरोपी पती मल्हारी (उर्फ बापू) खोमणे याला याला शोधण्यासाठी वालचंदनगर पोलिसांनी तातडीने पथके माळेगांव जेजुरी नातेपुते अन्य दिशेने पथके मार्गस्थ केली. अखेर काही तासांतच आरोपींला जेजुरीत वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असुन. आरोपी मल्हारी (उर्फ बापू ) याच्यावर यापूर्वी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी पतीने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपगिल सिंह अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर वालचंदनगर पोलीस ठाणेचे स.पो.नि. राजकुमार डुणगे पोलीस उपनिरीक्षक रथीलाल चौधर पोलीस हवालदार दादासाहेब डोईफोडे पोलीस कर्मचारी गुलाब पाटील गणेश काटकर महेश पवार कीर्तीलाल गायकवाड ज्योती डिसलें आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments