आकाश चोपडे यांनी घेतली अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नुकत्याच पार पडलेल्या यावल...
आकाश चोपडे यांनी घेतली अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नुकत्याच पार पडलेल्या यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवार सौ. वर्षाताई निरज चोपडे यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयानंतर त्यांचे पती तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निरज उर्फ आकाश चोपडे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.
यावेळी अजितदादा पवार यांनी यावल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व योजना व निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जोमाने काम करा, असे मार्गदर्शन उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस श्री. रवींद्र नाना पाटील, महिला आघाडीच्या प्रतिभाताई शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल तालुकाध्यक्ष निरज उर्फ आकाश चोपडे, भगतसिंग बापू पाटील, कदिर खान, गणेश येवले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे यावल नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तीन नगरसेवक यावेळी निवडून आले असून यामुळे पक्षाची यावल शहरातील ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

No comments