तृतीयपंथीयावर लाकडी दांडक्याने अमानुष हल्ला..दागिने व मोबाईल लुटले सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.२७):-...
तृतीयपंथीयावर लाकडी दांडक्याने अमानुष हल्ला..दागिने व मोबाईल लुटले
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२७):- शहरातील केडगाव परिसरात एका तृतीयपंथीयावर जुन्या प्रेमसंबंधातून बेदम मारहाण करून दागिने व मोबाईल हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.लोढे मळा भागात गुरुवारी रात्री ही घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पीडित अतुल उर्फ पूजा साटे (वय अंदाजे ३०), रा. केडगाव, देवी मंदिराजवळ,अहिल्यानगर असे असून त्यांचे संशयित आरोपी क्रुशिकेश गवळी याच्याशी मागील दहा वर्षांपासून संबंध होते.मात्र काही महिन्यांपूर्वी आरोपीने पीडिताकडून पैसे व सोन्याची माहिती लपवून फसवणूक केल्याने त्यांच्यातील संबंध तुटले होते.त्यानंतरही आरोपी वारंवार पीडिताशी संपर्क साधून व्यवसायासाठी घेतलेले पैसे व सोन्याचे दागिने परत देण्यास टाळाटाळ करत होता.२५ डिसेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पीडित आपल्या शिष्यांसह लोढेमळा भागात पैसे मागण्यासाठी गेले असता आरोपी क्रुशिकेश,त्याचे आई-वडील व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून पीडितावर लाकडी दांडक्याने अमानुष हल्ला केला.या हल्ल्यात पीडिताच्या पाठीवर,कंबरेवर व हातावर जबर मारहाण करण्यात आली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पीडिताच्या सहकाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपींनी पीडिताच्या गळ्यातील सोन्याची चैन व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमी अवस्थेत पीडिताने तेथून पळ काढत जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले.या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments