प्रहार अपंग संघटनेची आढावा बैठक संपन्न प्रतिनिधि,तेल्हारा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शासकीय विश्राम गृह तेल्हारा येथे प्रहार अपंग संघटना...
प्रहार अपंग संघटनेची आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधि,तेल्हारा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शासकीय विश्राम गृह तेल्हारा येथे प्रहार अपंग संघटना ची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती,आणि नवीन पद नियुक्ति चा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
यावेऴी प्रहार अपंग संघटना अकोला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संदीप गजानन ताथोड, यांचे प्रमुख मार्गदर्शनात मध्ये आणि प्रहार अपंग संघटना महिला तालुका अध्यक्षा ज्योती कैलास गाडेकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेऴी प्रहार अपंग संघटना तेल्हारा तालुका उपाध्यक्ष पदी इमरान खान, महिला उपाध्यक्ष पदी सौ. कुसुम खंडारे यांची निवड करण्यात आली आणि रखडलेला दिव्यांग निधी वाटप, दिव्यांग राखीव निधी अन्य विषयावर चर्चा करून ते सोडविण्याकरिता नेहमी तत्पर राहुन दिव्यांग बांधवांचे प्रश्न अडचणी सोडवु असे पदाधिकारी यांनी सांगितले

No comments