adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा महाविद्यालयात 'माझे महाविद्यालय, स्वच्छ महाविद्यालय' स्वच्छता अभियान उपक्रम साजरा

 चोपडा महाविद्यालयात 'माझे महाविद्यालय, स्वच्छ महाविद्यालय' स्वच्छता अभियान उपक्रम साजरा  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 चोपडा महाविद्यालयात 'माझे महाविद्यालय, स्वच्छ महाविद्यालय' स्वच्छता अभियान उपक्रम साजरा 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातर्फे दि.20 डिसेंबर 2026 रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'माझे महाविद्यालय, स्वच्छ महाविद्यालय'  स्वच्छता उपक्रम अभियानाचे  आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. के एन सोनवणे उपस्थित होते तसेच याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. एस. पाडवी, समन्वयक  ए. एन. बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रसंत गाडगेबाबांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त आवड होती. त्यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन  कनिष्ठ विभागाच्या कला व वाणिज्य शाखेतील  विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने महाविद्यालय परिसरातील प्लॅस्टिक,कागद, कचरा जमा करून महाविद्यालय परिसराची विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. 


    त्यानंतर या उपक्रमाची सांगता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे म्हणाले की, 'थोर महापुरुषांचे विचार हे फक्त भाषणातून ऐकायचे नसतात तर ते आत्मसात करून कृतीत उतरवण्याचे असतात. आज खऱ्या अर्थाने संत गाडगे महाराजांचा गावोगावी स्वच्छता अभियानाचा जो संदेश होता तो विद्यार्थ्यांनी कृतीतून  साकार केला हीच त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त खरी आदरांजली ठरेल. या कार्यक्रमाचे आयोजन  निवृत्ती पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेब जाधव, यांच्या दिनेश आलम, सौ.अनिता सांगोरे, निकिता शर्मा यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एस.टी.शिंदे, संदीप पाटील, भूषण बिरारी, विवेकानंद शिंदे, अभिजित पाटील, दीपक करंकाळ, विशाल बोरसे, संदीप देवरे, जयेश पाटील, सौ.पुष्पा दाभाडे, शिरीन सैय्यद, सौ.दीपाली पाटील, सौ.संगीता पाटील,  सौ.धनश्री पाटील, सौ. सुवर्णा बिऱ्हाडे, सौ.कीर्ती मोरे, सौ.आरती बोरसे रोहन पाटील, राकेश काविरे, धीरज बाविस्कर आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू -भगिनींचे सहकार्य लाभले.

No comments