पांडुरंग सराफ नगर येथे जखमी वासरावर बजरंग दलाच्या पुढाकाराने उपचार भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल:- आज दिन...
पांडुरंग सराफ नगर येथे जखमी वासरावर बजरंग दलाच्या पुढाकाराने उपचार
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल:- आज दिनांक 23/12/2025 रोजी पांडुरंग सराफ नगर परिसरात एका गोमातेचे वासरू जखमी अवस्थेत आढळून आले. सदर घटनेची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वासराचा सर्वत्र शोध घेतला.
वासराच्या पायाला गंभीर स्वरूपाची जखम झाल्याचे निदर्शनास येताच तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर प्रशांत कोळंबे यांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी वासराची तपासणी करून योग्य पद्धतीने उपचार केले. सध्या वासराची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रसंगी बजरंग दल तालुका सहसंयोजक हेमंत बडगुजर, ओम चोव्हाण, रवी आलोणे, ईश्वर माळी तसेच रोहन सोनवणे उपस्थित होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

No comments