मिरगव्हाण शिवारातील पब्लिक स्कुलच्या बांधकामावर कारवाई करण्याची सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांची मागणी भुसावळ प्रति...
मिरगव्हाण शिवारातील पब्लिक स्कुलच्या बांधकामावर कारवाई करण्याची सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांची मागणी
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ - येथील मिरगव्हाण शिवारातील बियाणी पब्लिक स्कुल गट क्र. 96/1, 96/2, 96/3 या जमीनीवर झालेले बांधकामावर कारवाई होवून निष्कसीत होण्याबाबत तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे 3/11/25 रोजी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, मा. सहाय्यक संचालक नगररचना जळगाव यांनी भुसावळ येथील जामनेर रोड शासकिय आयटीआय शेजारील मिरगव्हाण शिवारातील गट नं. 96/1, 96/2, 96/3 याबाबत बांधकाम परवानगी नसल्याचे 7/10/2025 रोजी म्हटले आहे. तसेच तहसील कार्यालय भुसावळ येथील मौजे मिरगव्हाण शिवारातील वरील गटामध्ये बांधकाम नकाशा किंवा परवानगी नसल्याचे दि.12/10/2025 रोजी कळविले आहे. तसेच भुसावळ उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्याकडील दि. 14/10/2025 रोजी परवानगी नसल्याचे अढळ होत आहे, अशी माहिती माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने सदरील बांधकामावर कारवाई करण्यासाठी प्रांत जितेंद्र पाटील व संबंधित वरिष्ठ कार्यालय तसेच इतर कार्यालयात माहितीस्तव योग्य कारवाई करिता तक्रार अर्ज सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दिला आहे. तरी सदरील प्रकरणात आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. या ठिकाणी शाळा, महाविद्यालय असल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी उपविभागीय अधिकारी हे काय कारवाई करतात याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 26 जानेवारी 26 रोजी उपोषणास बसण्याचा इशारा सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दिला आहे.
No comments