adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंढरपुरात प्रतिबंधात्मक पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर कारवाई, पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी ! अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले

पंढरपुरात प्रतिबंधात्मक पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर कारवाई, पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी ! अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणल...

पंढरपुरात प्रतिबंधात्मक पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर कारवाई, पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी ! अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले 


संभाजी पुरीगोसावी ( सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वास्तव्यास असणारे यशवंत दत्तात्रय जुमाळे उर्फ गवळी (वय 34) रा. महाद्वाररोड पंढरपूर) यांनी त्यांच्या राहत्या घरांमध्ये आपल्या आर्थिंक फायदा करता विक्री करण्यासाठी प्रतिबंधात्मक पान मसाला व गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा करून तो विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक घोडके यांनी आपल्या पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना सदर ठिकाणी जावुन कारवाईबाबत सूचना दिल्या. असता ठिकाणी पंढरपूर शहर पोलिसांनी यशवंत जुमाळे यांच्या घरी जाऊन कारवाई करून प्रतिबंधात्मक साठा करण्यात आलेला पान मसाला गुटखा व सुगंधी तंबाखू असा जवळपास मुद्देमाल 66 हजार 624 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली आहे. यशवंत जुमाळे यांनी आपल्या राहत्या घरात पहिल्या मजल्यावर प्रतिबंधात्मक असलेला पानमसाला व एम. सुगंधित गुटखा असा प्रतिबंधात्मक मुद्देमाल त्यांच्या राहत्या घरात मिळून आल्याने तो मुद्देमाल जप्त करून पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात आणला. याबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकारी चन्नवीर राजशेखर स्वामी यांच्याशी संपर्क साधून कायदेशीर फिर्याद देण्यात आलेली आहे. पंढरपूर शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे सध्या शहरांत अवैध धंदे वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे स.पो.फौ. कल्याण ढवणे पोलीस नाईक सचिन इंगळे पोलीस हवालदार विठ्ठल विभते पो.कॉ. शहाजी मंडले कापिल माने दीपक नवले आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments