राजकीय क्षेत्रातील कर्दनकाळ नेत्या आणि कोरेगांव तालुक्यांचा आवाज हरपला, डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन ! संभाजी पुरी गोसावी (सातारा जिल...
राजकीय क्षेत्रातील कर्दनकाळ नेत्या आणि कोरेगांव तालुक्यांचा आवाज हरपला, डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन !
संभाजी पुरी गोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्यांचे माजी मंत्री दिग्वंत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी डॉ. शालिनीताई पाटील यांचे नुकतेच मुंबई येथे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. मुंबईतील माहिम येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकीय क्षेत्रामध्ये कर्दनकाळ नेत्या म्हणून सातारा,सांगली जिल्ह्यासाठी त्यांचा नेहमीच आवाज कायम होता. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या त्या आजी होत्या. डॉ. शालिनीताई पाटील यांच्या पार्थिंवावर साताऱ्यातील कोरेगांव या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. वयाच्या 94 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिल्यांदा आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून शालिनीताईंना ओळखले जात होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकेकाळी काँग्रेसची महाराष्ट्राची धुरा ताईवर सोपवली होती. स्वर्गीय. यशवंतराव चव्हाणही ताईंना आदरांने मान द्यायचे. डॉ. शालिनीताई पाटील यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. शालिनीताई पाटील या वसंतदादांच्या दुसऱ्या पत्नी होत्या त्यांनी वसंतदादांना खंबीरपणे साथ दिली होती. त्यामागील काही दिवसापासून आजारी होत्या त्यांनी महाराष्ट्रांच्या राजकारणात स्वतःची एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली होती. शालिनीताई पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

No comments