अल्पसंख्याकांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी - एजाजभाई बागवान नंदुरबार मध्ये आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस म...
अल्पसंख्याकांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी - एजाजभाई बागवान
नंदुरबार मध्ये आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस मोठ्या उत्साहात साजरा
नंदुरबार / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा नियोजन विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस यानिमित्त वक्तृत्व, भित्तीपत्र व निबंध स्पर्धांचे बक्षिस वितरण तसेच परीसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन अतिरिक्त पोलीस उपअधिक्षक संजय महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, मौलाना आझाद महामंडळाचे विजय सैंदाणे व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी एजाजभाई बागवान, मौलाना जकेरीया, अमिन कुरैशी आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे नंदुरबार जिल्हा समन्वयक एजाजभाई बागवान यांनी आपल्या मनोगतात शासनाच्या विविध खात्यातील शासकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती बाबत नाराजी व्यक्त करत केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, नंदुरबार जिल्ह्यात उर्दू घर व अल्पसंख्यांक भवन मध्ये हायटेक लायब्ररी एम पी एस सी व यु पी एस सी मार्गदर्शन केंद्र व विद्यार्थ्यांसाठी निवास सुविधा तातडीने मंजूर करण्याची यावी यासोबतच प्रधानमंत्री विकास योजना अल्पसंख्यांक समाजासाठी पाचवी ते बारावीपर्यंत ओपन स्कूल होणे गरजेचे असल्याने यावर विचार होवून तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसाचे महत्व व त्या निमित्ताने आयोजित स्पर्धांची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थी मनोगत अंतर्गत काजी निदा फातेमा, लायबा सैय्यद, फहमिना शाह, अतिफा मोमीन, आमेना सैय्यद, कादीर अन्सारी, दानीश कुरैशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अल्पसंख्यांक विभागाच्या योजनांची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे तसेच मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचे विजय सैंदाणे यांनी दिली.
यावेळी तालुकास्तरावर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केल्यामुळे प्राचार्य फैय्याज पठाण, हरीष बोरसे, रफिक जहांगीरदार, जव्वाद सैय्यद, सत्यजित नाईक, कालिदास पाठक, इसरार सैय्यद, मुदब्बीर पठाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात यशस्वी कामगिरी केल्यामुळे प्रशिक्षणार्थी अशफाक इनामदार, जव्वाद कुरैशी यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेला व वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या नंदुरबारच्या रहेबर शाळेचा विद्यार्थी मोहम्मद दानिश कुरैशी याचा अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत रोख रु. ११००/- रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षण विभागाचे डॉ. युनूस पठाण यांनी केले तर आभार जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन विभागाचे सहाय्यक नियोजन अधिकारी मनिष सुर्यवंशी, एल.के. कोकणी, संतोष बोदडे यांनी परीश्रम घेतले.
यशस्वी स्पर्धक खालीलप्रमाणे
निबंध स्पर्धा-
नंदुरबार तालुक्यातून सादिया हफिज खान, राहुल प्रकाश मराठे, नवापूर तालुक्यातून समीरा खाटीक, आयेशा परवेज लाखाणी, शहादा तालुक्यातून हुमेरा बेलदार, राबीया अन्सारी, तळोदा तालुक्यातून अथर्व सोनार, फहेमिना शाह, अक्कलकुवा तालुक्यातून उमूर मोहम्मद,जिया पिंजारी, धडगांव तालुक्यातून रोषन वळवी, रंजिना पावरा
वक्तृत्व स्पर्धा-
नंदुरबार तालुक्यातून अब्दुल कादिर अन्सारी, काजी निदा फातेमा, नवापूर तालुक्यातून अक्सा बेलदार, आमेना सैय्यद, शहादा तालुक्यातुन युसैरा तेली, लायबा सैय्यद, तळोदा तालुक्यातून साहिल सोनवणे, प्रित सोनगडवाला,अक्कलकुवा तालुक्यातून उम्मे हानी काजी, अतिफा मोमीन, धडगांव तालुक्यातून एश्वर्या पावरा, प्रियंका पावरा
भित्तीपत्रक स्पर्धा-
नंदुरबार तालुक्यातून सारा खान, जोहरीन पठाण, नवापूर तालुक्यातून हसनैन शेख, सादीया शेख, शहादा तालुक्यातून हन्जला बेलदार, अक्सा मनियार, तळोदा तालुक्यातून शिजा मनिया, मिकाईल शेख, अक्कलकुवा तालुक्यातून बुशरा कुरैशी, जोबीया फारुकी,धडगांव तालुक्यातून दिव्या पावरा, विद्या पावरा यांनी सहभाग नोंदवला.




No comments