बिबट्याच्या हल्ल्यात ०४ वर्षांचा चिमुकला ठार.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.१४):-संगमनेर तालुक्यातील ...
बिबट्याच्या हल्ल्यात ०४ वर्षांचा चिमुकला ठार..
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१४):-संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा बळी गेल्याची घटना घडली आहे.काल शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दारात उभ्या असलेल्या सिद्धेश कडलग या चिमुकल्याला जागेवरच ठार केलं. या घटनेनंतर चिमुकल्याचे नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला होता. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्याचं चित्र होतं. जवळे कडलग मधील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे.काल शनिवारी सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते. तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चार वर्षाचा चिमुकला सिद्धेश कडलग हा घराच्या दारात उभा होता. सिद्धेश एकटा असल्याची संधी साधत गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याला हल्ला करत जागेवरच ठार केले.

No comments