adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

७९ व्या होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त यावल तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

७९ व्या होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त यावल तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन   भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...

७९ व्या होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त यावल तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन  


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मा. अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड माननीय श्री. अशोक नखाते सर यांच्या आदेशान्वये व प्रशासकीय अधिकारी श्री. रामनाथ काळे सर, केंद्रनायक श्री. गंगाधर महाजन, सामग्री प्रबंधक सुभेदार श्री. मदन रावते सर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समादेशक अधिकारी श्री. विजय जावरे यांच्या नेतृत्वाखाली ७९ व्या होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त यावल तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.



वर्धापन दिनानिमित्त यावल शहरातून भव्य पथसंचलन काढण्यात आले. तसेच यशोदायी फाउंडेशन वृद्धाश्रम येथे वृद्ध व्यक्तींना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेट व अल्पहार वाटप करण्यात आले. याशिवाय आदिवासी पाड्यावर गरजू महिला व पुरुषांना थंडीचे ब्लँकेट व फळांचे वाटप करण्यात आले. लहान मुलांसाठी खाऊवाटपाचाही कार्यक्रम राबविण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी तालुका समादेशक अधिकारी श्री. विजय जावरे, वरिष्ठ पलटण नायक श्री. पंकज फिरके तसेच अनायुक्त अधिकारी श्रीमती ज्योती बारी, श्री. भगवान पाटील, श्रीमती संगीता पाटील, श्रीमती अर्चना कोळी, श्रीमती निशा कदम, श्री. कैलास लावणे, श्री. टेकचंद फेगडे, श्री. प्रवीण तेली, श्रीमती सोनल कोळी, श्रीमती मुमताज चिखलीकर, श्री. रऊफ खान, श्री. वसीमदिन, श्री. सागर पाठक, श्री. अशोक बडगुजर, श्री. संतोष बारी, श्री. संदीप कोळी यांच्यासह महिला व पुरुष होमगार्ड जवानांनी सहकार्य केले.

No comments