समस्त तेली समाज चोपडा तर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती साजरी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- श्री, संताज...
समस्त तेली समाज चोपडा तर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती साजरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- श्री, संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा तर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त 9डिसेंबर 2025 रोजी दु . 2ते 5या कालावधीत महंत अशोकदासजी महाराज यांनी आपल्या अमृत वाणीद्वारे भागवत कथा सांगितली.सुरवातीला महंत अशोकदासजी महाराज यांचे सुपुत्र स्व चेतन,शहीद स्व.चेतन पांडुरंग चौधरी,स्व. चि. पार्थ निलेश चौधरी व स्व. मीनाक्षी निलेश चौधरी यांचे स्मरण करून त्यांना सदगती मिळावी म्हणून भागवत कथेचे आयोजन असून संताजी महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथी उत्सव निमित्त साधण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. भागवत कथेच्या श्रवणाने पापाचे क्षरण होते असे नमूद करून धुंधुकारी, राजा परीक्षित व अन्य कथा सांगून स्पष्ट केले. राजेंद्र गणपत चौधरी, गोपीचंद महाराज, सूर्यकांत चौधरी,बापू महाराज , प्रकाश महाराज, शाम महाराज आदींनी आरती केली. श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर,तेली समाज मंगल कार्यालय श्रीराम नगर चोपडा येथे सात दिवस भागवत कथा व रात्री कीर्तन श्रावणाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष के डी चौधरी सर,उपाध्यक्ष टी एम चौधरी सर देवकांत के चौधरी गुलाब चौधरी यांनी केले आहे.

No comments