पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद..स्थानिक गुन्हे शाची धडाकेबाज कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर ...
पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद..स्थानिक गुन्हे शाची धडाकेबाज कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२८):-पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख यास स्थानिक गुन्हे शाखा यांनी अटक करून जेरबंद केले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि.04 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 05.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी श्री.दिपक किसन जाधव, (रा.लक्ष्मीनगर,गल्ली नं.3,शिर्डी, ता.राहाता) हे त्यांचा मुलगा निलेश याच्यासह शिर्डी येथून सावळीविहीर येथे जात असताना आरोपी पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादीच्या मुलास अडवून पिस्तुल दाखवून शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 964/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 189 (2), 191 (2)(3), 190, 351 (2), 352, 126 तसेच आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपींची माहिती काढून त्यांना ताब्यात घेण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या.त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. दिपक मेढे,पोलीस अंमलदार फुरकान शेख,विजय पवार,राहुल द्वारके,राहुल डोके,भिमराज खर्से, सतीश भवर,सुनील मालणकर, प्रशांत राठोड,प्रमोद जाधव तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोउपनि. सागर काळे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.दि.26 डिसेंबर 2025 रोजी आरोपींची माहिती घेत असताना आरोपी पाप्या शेख हा शिर्डी परिसरातील फायबर कारखान्याजवळ असलेल्या हॉटेल रेणुका यांच्या पाठीमागील काटवनात बसल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला,मात्र पाठलाग करून त्यास ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेल्या आरोपीने त्याचे नाव पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (वय 45 वर्षे, रा.कालीकानगर,शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) असल्याचे सांगितले.सदर आरोपीस पुढील तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे

No comments