सोशल मीडिया आणि तरुणाई तरुणांना सोशल मीडिया म्हणजे जीव की प्राण झालेला आहे.सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ पाहून पाहून तरुण हे वाम मार्गाला ग...
सोशल मीडिया आणि तरुणाई
तरुणांना सोशल मीडिया म्हणजे जीव की प्राण झालेला आहे.सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ पाहून पाहून तरुण हे वाम मार्गाला गेलेले आहेत. आत्ताच्या तरुण मुलांना गर्लफ्रेंड म्हणून ऑंटी मुलगी पाहिजे म्हणजे लग्न झालेली स्त्री पाहिजे. तर मुलींना लग्न झालेला पुरुष हा बॉयफ्रेंड म्हणून पाहिजे. अशी मनस्थिती आज सोशल मीडियामुळे तरुणांची झालेली आहे.मुली ह्या पैशांसाठी आपल्यापेक्षा खूप वय अधिक माणसाबरोबर प्रेम करतात. प्रेमाचे चाळे करतात आणि आपलं आयुष्य उध्वस्त करतात. मुलं हे लग्न झालेल्या स्त्रीच्या मागे लागून तिचा गैरफायदा घेतात. तिच्याबरोबर मजा मारतात तिचा वीट आल्यानंतर तिला सोडून देतात. तिने जर लग्नाचा तगादा लावला तर मात्र तिचा जीव घेतला जातो. सोशल मीडिया वरती कमी कपडे घालून काही मुली अश्लील व्हिडिओ करतात.लाईक कमेंट साठी स्वतःची इज्जत घालवतात. त्याबरोबर त्यांच्या आई-वडिलांची इज्जतही घालवतात. आज हे सर्व घडतंय ना ते फक्त असंस्कारामुळे घडलं जाते.या मुलांना आई-वडिलांचा धाक वडीलधाऱ्यांचा धाक राहिलेला नाही ही मुलं वाह्यात गेलेली आहेत. ही मुलं मन मौजी प्रमाणे आपल आयुष्य जगतात. सेक्स करनारे vedio , अश्लील व्हिडिओ पहाने.तासंन तास तर सोशल मीडिया वरती पडून राहने हेच आता उद्योग या तरुणा जवळ राहिले आहे.कामधंदे नसतात ती तरुण टपरीवाल्या जवळ जशी बसून असतात.तशी तासंतास तर सोशल मीडिया वरती अश्लील व्हिडिओ पाहण्यात बायकांना वेगवेगळे मेसेज करण्यात टपलेली असतात. एक काळ असा होता की आपल्या तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच जीवदान केलं. पण आताची तरुणाई ही आपल्या आई-वडिलांचा विचार न करता समाजाचा विचार न करता सेक्स बंधनामध्ये राहिलेली आहेत. दारू पिणं गांजा खान पब मध्ये जाऊन धिंगाणा घालणं, वेडेवाकडे डान्स करून म्हणजे तरुणांना आता ही आवड निर्माण झालेली आहे. जी मुलगी कमी कपडे जास्त घालेल ती मुलगी आधुनिक म्हटलं जातं. तर ज्या तरुणांजवळ जास्त गर्लफ्रेंड आहे तो तरुण आधुनिक म्हटलं जातं.अशी ही तरुणांची मेंटॅलिटी झालेली आहे.तरुणांनो सावध व्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करत आहात.तुम्ही तुमच्या आई-वडिलांची इज्जत चव्हाट्यावर आणत आहात.बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बरोबर सेक्स करणे म्हणजे जीवन नाही हे तात्पुरतं सुख आहे.तुम्हाला जे मिळतंय ते सुख आधी गोड वाटेल त्यानंतर ते सुख तुम्हाला विषयासारखं विष बनवून तुमचा घात करेल. जी गरीब मुलं आहेत ती मुलं आध्यात्मिक आहेत. चांगलं कर्म करतात आपल्या आई-वडिलांना सांभाळतात. आपल्या करिअर कडे लक्ष देतात. कष्ट करतात.पण काही श्रीमंताने माजलेली मुलं मुली आहेत त्या मुलांनी मात्र आपल्या आयुष्याची राख रांगोळी केलेली आहे.मुलांनो तुम्हाला जीवन पाहायचं असेल ना तर तुमचं मरण पहा. मेल्यानंतर तुम्ही कुठे जाल तुमचं पुढे काय होणार हा विचार करा. जे तुम्ही आता आयुष्यामध्ये तुमच्या आहेत आई वडील नातेवाईक हें तुम्हाला कोणी नंतर मदत करणार आहेत का?कोण तुमच्याबरोबर मुतू नंतर येणार का?फक्त तुमचं कर्म येणार.मग ते कर्म तुम्ही तरुण वयातच चांगलं करा. ही सगळी मोहमाया आहे.जबाबदारीने वागा. आपल्याला कोणत्या रोगाची लागण होणार नाही ना ह्याची काळजी घ्या.आपल्याला समाजामध्ये मानसन्मान मिळेल असं कर्म करा. आई-वडिलांचे नाव काढतील.लोक चांगले बोलतील सन्मान देतील असं कर्म करा.आई-वडिलांना वाईट बोलतील तिरस्कार करतील असं कर्म करू नका. आपण या देशाची शान आहोत. या देशासाठी काय तरी करा किमान देशासाठी नव्हे तर स्वतःसाठी काय तरी चांगलं कर्म करा.का तर लोकांनी तुमची वाहवा केली पाहिजे.या सोशल मीडियाच्या मागे लागून तुम्ही तुमच आयुष्य उध्वस्त करू नका.किती संसारा मोडलं मोडली आहेत या सोशल मीडियाच्या नादाला लागून आपण विचार देखील करू शकत नाही. सुधरा मुलांना सुधरा या देशाचे सुरक्षित नागरी कर्तव्यदक्ष नागरिक व्हा आणि चांगलं कर्म करा. पहा सगळ्या देवांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल आणि एक कर्तबगार मुलगा व मुलगी म्हणून तुमचे समाजामध्ये ओळख होईल.
शब्दांकन
लेखिका तृप्ती पाटील मुंबई✍️✍️✍️

No comments