मलकापूरमध्ये भरधाव ट्रकचा ताबा सुटला बुलढाणा रोडवरील अतिक्रमणधारकांचे लाखोंचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली अमोल बावस्कार बुलढाणा (संपाद...
मलकापूरमध्ये भरधाव ट्रकचा ताबा सुटला बुलढाणा रोडवरील अतिक्रमणधारकांचे लाखोंचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर :- मलकापूर शहरात आज दि. २७ डिसेंबर रोजी पहाटे सुमारे अडीच वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. MH-40 BC 5608 क्रमांकाच्या भरधाव ट्रकचा चालकावरील ताबा अचानक सुटल्याने ट्रक थेट बुलढाणा रोडवरील रस्त्याकडेला असलेल्या अतिक्रमणांवर आदळला. या अपघातात अतिक्रमणधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका जोरदार होता की रस्त्यालगत असलेली टपऱ्या, हातगाड्या व साहित्य पूर्णतः उद्ध्वस्त झाले. सुदैवाने ही घटना पहाटेच्या वेळी घडल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र संबंधित व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस स्टेशन मलकापूर येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून ट्रक चालकाची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे बुलढाणा रोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावरील अतिक्रमण आणि अवजड वाहनांच्या वेगाबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

No comments