adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोयता हातात घेऊन एकाची दहशत..एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..आर्मॲक्ट सह गुन्हा दाखल

 कोयता हातात घेऊन एकाची दहशत..एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..आर्मॲक्ट सह गुन्हा दाखल  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 कोयता हातात घेऊन एकाची दहशत..एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..आर्मॲक्ट सह गुन्हा दाखल 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.26):-निंबळक परिसरात अवैधरीत्या धारदार कोयता बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या इसमाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर कारवाईत आरोपी कडून धारदार कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.26/12/2025 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,निंबळक बायपास, निंबळक ता.जि.अहिल्यानगर येथे एक इसम हातात अवैधरीत्या धारदार कोयता बाळगून मोठमोठ्याने ओरडून परिसरात दहशत निर्माण करत आहे.

ही खात्रीशीर माहिती मिळताच सपोनि.माणिक चौधरी यांनी तात्काळ स्वतंत्र पथक तयार करून सदर ठिकाणी रवाना केले. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच एक इसम हातात धारदार कोयता घेऊन मोठमोठ्याने ओरडत असल्याचे आढळून आले.पोलिसांना पाहताच तो इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव अजय संजय हारेर, वय ३१ वर्षे,रा.निंबळक,ता.जि. अहिल्यानगर असल्याचे सांगितले.त्याच्या ताब्यातील धारदार कोयता पंचासमक्ष जप्त करण्यात आला.या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशन अहिल्यानगर येथे आरोपीविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक तसेच श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी (प्रभारी अधिकारी, एमआयडीसी पोलिस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनि.मनोज मोंढे, पोलीस अमलदार राकेश खेडकर, सचिन आडबल, संदीप पवार, पोलीस अंमलदार पितळे, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव यांनी केली आहे.

No comments