adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत “राष्ट्रीय ग्राहक दिन” निमित्ताने प्रा. डॉ. चंद्रकांत आर. देवरे सरांचे व्याख्यानाचे आयोजन

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत “राष्ट्रीय ग्राहक दिन” निमित्ताने प्रा. डॉ. चंद्रकांत आर. देवरे सरां...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत “राष्ट्रीय ग्राहक दिन” निमित्ताने प्रा. डॉ. चंद्रकांत आर. देवरे सरांचे व्याख्यानाचे आयोजन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत “राष्ट्रीय ग्राहक दिन” निमित्ताने प्रा. डॉ. चंद्रकांत आर. देवरे सरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर व्याख्यानात देवरे सर म्हणाले की, ग्राहकांचे हित हे ग्राहकांचा हातातच असून योग्य प्रकारे दाद मागता यायला पाहिजे, ग्राहकांचे हक्क व दाद मागण्याचे स्तर व फसवणुकीपासून स्वत:चे स्व:रक्षण कसे करावे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन  केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. पी. एस. पाडवी सर यांनी भूषवले. मार्गदर्शनपर भाषणाप्रसंगी ते म्हणाले की, विद्यार्थी हे महाविद्यालयाचे ग्राहक आहेत जर त्यांना शिक्षकांकडून व्यवस्थित मार्गदर्शन मिळाले नाही तर ते तक्रार करू शकतात इत्यादि. स्वरूपाचे असे विविध उंदहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्याना ग्राहक जागृती संबंधी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १२ वी वाणिज्य वर्गाची विद्यार्थिनी कु. आरती विनोद पाटील हिने  केले. प्रास्ताविक कु. मोनिका दीपक पाटील हिने केले तर विद्यार्थी मनोगतात कु. कीर्ती विनोद कोळी व कु. कोमल समाधान धनगर यांनी आपले विचार मांडलेत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. व्ही. डी शिंदे सर यांनी माणलेत.

सदर कार्यक्रम आयोजन कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभाग मार्फत उपशिक्षक श्री. दीपक करणकाळ व श्री. विशाल बोरसे यांनी केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. पी. एस.पाडवी, कनिष्ठ विभागातील पर्यवेक्षक श्री. ए. एन. बोरसे सर तसेच प्रवीण जैन सर, जेष्ठ शिक्षक श्री. संदीप पाटील सर, श्री. एस. टी. शिंदे सर, सौ. अनीता सांगोरे मॅडम, श्री. प्रमोद पाटील सर, श्री. बाबासाहेब जाधव सर, श्री. दिनेश अलाम सर, श्री. व्ही. डी. शिंदे सर, श्री. निवृत्ती पाटील सर व निकिता शर्मा मॅडम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्री. व्ही.डी. शिंदे सर व श्री. सौरभ जैन सर यांचे लाभले. तसेच महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील शिक्षकांचे देखील सहकार्य लाभले.

No comments