adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कराड तालुका पोलिसांची कामगिरी,बेड्यासह पळ काढलेल्या आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात,आरोपीने केला होता बलात्कार !

 कराड तालुका पोलिसांची कामगिरी,बेड्यासह पळ काढलेल्या आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात,आरोपीने केला होता बलात्कार !  संभाजी पुरीगोसावी (सातारा...

 कराड तालुका पोलिसांची कामगिरी,बेड्यासह पळ काढलेल्या आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात,आरोपीने केला होता बलात्कार !


 संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अत्याचारांच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना चकवा देत हातात असलेल्या बेडयासह धूम ठोकली होती. त्या अनुषंगाने पुन्हा कराड तालुका पोलीस ठाणे कडील  गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. गणेश बिराजदार यांनी आपल्या कर्मचार्‍यांसमवेत आरोपीचा शोध घेवुन पुण्यातून ताब्यात घेतले आहे. गोटे (ता.कराड) येथील अत्याचारांच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपी अनिकेत प्रकाश लोहार (वय 23) रा. कोळे ता.कराड जि.सातारा) असे या फरार झालेल्या आरोपींचे नाव होते अशी माहिती कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. गणेश बिराजदार यांनी याबाबत माहिती दिली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. गणेश बिराजदार यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments