adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चंदन तस्करीचा पर्दाफाश! लाखोंचा मुद्देमाल जप्त;स्विफ्ट कारसह आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

 चंदन तस्करीचा पर्दाफाश!  लाखोंचा मुद्देमाल जप्त;स्विफ्ट कारसह आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर (सं...

 चंदन तस्करीचा पर्दाफाश! 

लाखोंचा मुद्देमाल जप्त;स्विफ्ट कारसह आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१९):-अवैध चंदन तस्करी विरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत नाशिक येथून श्रीरामपूरकडे चंदनाची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.अवैध चंदन वाहतूक व विक्री करणाऱ्यां विरोधात ही मोहीम राबवण्यात आली.दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी लोणी पोलीस ठाणे हद्दीत गस्त सुरू असताना,पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून नाशिक येथून चंदनाची लाकडे विक्रीसाठी श्रीरामपूरकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार तळेगाव–लोणी रोडवरील डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सेंटर परिसरात सापळा रचण्यात आला.तळेगावकडून येणारी स्विफ्ट कार थांबवून तपास केला असता, चालकाने आपले नाव हनुमंता भिमा मोरे (वय ४५, रा. उंबरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे सांगितले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ३० किलो चंदनाची लाकडे – किंमत ६०,००० रु. मारुती सुझुकी स्विफ्ट कार – किंमत ५,००,००० रु.मोबाईल फोन – किंमत १०,००० रु.

असा एकूण ५,७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.चौकशीत आरोपीने चंदनाची लाकडे उत्तम नारायण पवार (रा. पळसे साखर कारखाना शेजारी, ता. सिन्नर, जि. नाशिक) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली असून, सदर व्यक्ती सध्या फरार आहे.या प्रकरणी लोणी पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ६५९/२०२५ नुसार बीएनएस २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) तसेच भारतीय वन कायदा १९२७ चे कलम ४२ व महाराष्ट्र वन अधिनियम कलम ३, ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी पोलीस ठाणे करीत आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल द्वारके,भीमराज खरसे,राहुल डोके,प्रमोद जाधव,सतीश भवर, सुनील मालकर,चालक महादेव भांड यांनी केली आहे.

No comments