adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची बदली, राकेश ओला यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला !

 अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची बदली, राकेश ओला यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला !  संभाजी पुरीगोसावी (अमरावती जिल्हा)...

 अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची बदली, राकेश ओला यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला ! 


संभाजी पुरीगोसावी (अमरावती जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून आज रोजी राकेश ओला यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात हजर होऊन आपल्या सहीने अमरावती पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर  मावळते पोलीस आयुक्त म्हणून असलेले अरविंद चावरिया यांची अवघ्या 8 महिन्यांतच बदली करण्यात आली आहे. अरविंद चावरिया हेही अमरावती पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या आता बदलीनंतर रिक्त झालेल्या जागी बृहन्मुंबई वरून  आयपीएस अधिकारी राकेश ओला यांची 13 डिसेंबरला अमरावती पोलीस आयुक्त म्हणून बदली आदेश जारी करण्यात आला होता. सध्या पोलीस खात्यात आता हळुवार बदल्यांचे वारे चांगलेच वाहू लागले आहे. राकेश ओला यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक तर नागपूर बृहन्मुंबई अशा विविध ठिकाणी उत्कृंष्ट सेवा दिली आहे. आयपीएस अधिकारी राकेश ओला हे 2012 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले राकेश ओला हे सरळ सेवा भरतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर 2014 मध्ये नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली होती. त्यावेळी त्यांनी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीने नगरसह संपूर्ण राज्यांत चांगलाच हैदौस घातला होता अशा टोळीचा त्यांनी चांगला छडा लावला होता. आज रोजी त्यांची अमरावती चे नवे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आचारसहिंता लागू होण्याआधींच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या तडकाफडकी बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था आणि कडक अंमलबजावणीसाठी आयपीएस अधिकारी राकेश ओला यांची ही नियुक्ती अमरावतीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आणि आयपीएस अधिकारी म्हणून राकेश ओला यांना पोलीस खात्यात ओळखले जाते.

No comments