adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी घेतली पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांची पाळधीत सदिच्छा भेट

 लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी घेतली पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांची पाळधीत सदिच्छा भेट   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत ग...

 लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी घेतली पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांची पाळधीत सदिच्छा भेट  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

चोपडा-- चोपडा नगरपालिकेचे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नम्रता सचिन पाटील यांनी आज दि ३१ रोजी सकाळी साडे आठ वाजता पाळधी येथे जाऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री ना गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच यावेळी पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी देखील आपण चोपडा शहराच्या सर्वांनी विकासासाठी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यात असे कौतुक करून नम्रता पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन  सत्कार केला होता यावेळी सचिन पाटील ,पालकमंत्र्याचे स्वीय सहाय्यक बंडू नारखेडे, नवसिंगराजे पाटील,गणेश कोळी,  आदी हजर होते.

 भेटीदरम्यान नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी सांगितले की चोपडा शहराच्या विकासासाठी आपले सहकार्य मला पाच वर्षे लागेल,जास्तीत जास्त निधी यापुढे देखील चोपड्याच्या विकासासाठी आपण द्यावा अशी मागणी केली. ना पाटील यांनी देखील आवर्जून सांगितले की,आपले आमदार चंद्रकांत सोनवणे  यांनी जो चोपडा तालुक्यात आणि शहरात जो विकास केला आहे त्याला जननेने भरभरून मतदान केले म्हणून आपला विजय अधिक सोपा झाला.यापुढे देखील आपणास जास्तीत जास्त निधी चोपड्यासाठी देऊ असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्वाही दिली.

No comments