adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल तालुक्यात पँथर सेनेचे नवे तालुका अध्यक्ष म्हणून सतीश अळकमोल यांची नियुक्ती

 यावल तालुक्यात पँथर सेनेचे नवे तालुका अध्यक्ष म्हणून सतीश अळकमोल यांची नियुक्ती  यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल │ ऑल इ...

 यावल तालुक्यात पँथर सेनेचे नवे तालुका अध्यक्ष म्हणून सतीश अळकमोल यांची नियुक्ती 


यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल │ ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोदभाऊ भोळे तसेच जिल्हा अध्यक्ष लखन पानपाटील यांच्या आदेशानुसार सतीश अळकमोल यांची यावल तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सतीश भाऊ हे अत्यंत जोशीले, मेहनती आणि जमिनीवर उतरून काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सामाजिक न्यायासाठी सदैव सज्ज राहणारे सतीश भाऊ गोर-गरीब, वंचित, पीडित नागरिकांच्या अधिकारांसाठी दिवस असो की रात्र — तात्काळ मदतीला धावून जाणारे एक प्रभावी नेतृत्व म्हणून लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या धडाडीच्या कामामुळे पँथर सेनेच्या नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नियुक्तीने यावल तालुक्यातील पँथर सेनेच्या कार्याला अधिक जोम मिळेल, असा विश्वास नेते व कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.नवीन तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सतीश भाऊंना तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments