विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम येथे रक्तदान शिबिर संपन्न. वाशिम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम येथे रक्तदान शिबिर संपन्न.
वाशिम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी वाशीम येथे त्रिरत्न बुद्ध विहार नालंदा नगर वाशिम या ठिकाणी #blood for babasaheb washim, स्वर.लहानुजी नारायण मानवतकर बहुद्देशीय संस्था वाशिम , AIBTS, जगदीश मानवतकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात वाशिम येथील ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आणि कार्याला रक्तातून अभिवादन केले. सविस्तर वृत्त असे की महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असल्याने सन २०२२ पासून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षीही सलग चौथ्या वेळेस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख अध्यक्ष म्हणून आयु.गोपाळराव आटोटे गुरुजी तर मुख्य मार्गदर्शक म्हणून आयु. दिलीप गवई सर यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संजय वैरागडे, दौलत हिवराळे , माधव डोंगरदिवे, राजकुमार पडघान, समाधान अवचार यांची उपस्थिती लाभली
तर विशेष अतिथी म्हणून विनोद तायडे , अनिल कांबळे , पप्पू घुगे सौ.वंदनाताई भगत यांची उपस्थिती लाभली . या कार्यक्रमाचे निमंत्रक व आयोजक जगदीश मानवतकर होते .तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आशिष कोकरे ,दिलीप सरकटे, अतिश वैरागडे, समाधान खंदारे, सुरेश खरात, सुरेश कुचेकर, संतोष लांडकर, सविधान ढोले यांनी परिश्रम घेतले. यावेळी आयु. गोपाळराव आटोटे गुरुजी यांनी '' जगदीश मानवतकर यांचा उपक्रम अतिशय समाज उपयोगी असून त्यांच्या या कार्यामुळे त्यांनी रुग्णांचे जीव वाचवले जात आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन म्हणून रक्तदान करणे हे खरच खूप महान कार्य आहे . म्हणून आपण सर्वांनी या दिवशी रक्तदान करायला हवे '' असे विचार मांडले तर मुख्य मार्गदर्शक म्हणून दिलीप गवई सर यांनी '' रक्तदान करणे हे खूप पुण्याचे काम आहे . रक्तदान केल्याने कोणत्याही आजाराला आपण बळी पडत नाही. रक्तदान केल्याने आपल्याला नवसंजीवनी मिळते . रक्तदान केल्याने आपल्या शरीरात नव्या पेशी तयार होतात त्यामुळे आपण रक्तदान करायला हवे.'' असे विचार मांडले. तर जगदीश मानवतकर यांनी ' #blood for babasaheb आणि स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहुउद्देशीय संस्था वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आजच्या दिवशी दरवर्षी आयोजित केले जाते. याचेच औचित्य साधून याही वर्षी प्रसाद शिवराज आयोजन करण्यात आले होते. विश्वरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि त्यागाला आपल्या रक्तातून अभिवादन करणे हीच खरी त्यांच्या कार्याला आदरांजली ठरेल. मी दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करतोच परंतु या दिवशी रक्तदान सुद्धा करतो आणि आतापर्यंत मी पूर्ण आयुष्यात चारशेच्या वर रक्तदान शिबिर आयोजित केली आहेत आणि पुढेही करत राहणार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन म्हणून आपण सर्वांनी दरवर्षी 6 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या प्रमाणात रक्तदान करायला हवे आणि दुसऱ्या रुग्णांचा जीव वाचवायला हवा ." असे विचार मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता त्रिरत्न बुद्ध विहार चे अध्यक्ष आयु. दिलीप गवई सर यांनी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार जगदीश मानवतकर यांनी मानले . तर हा कार्यक्रम सुरू करण्याकरिता #blood for babsaheb,स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहुद्देशीय संस्था वाशिम , ऑल इंडिया ब्लू टायगर सेना, जगदीश मानवतकर मित्र मंडळ वाशिम ज्या सर्व कार्यकर्त्यांनी अहो रात्र परिश्रम घेतले.



No comments