adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सोशल मीडियाचा विकृत चेहरा... इंस्टाग्रामचा नकार ठरला कारण.. तरुणीचा विनयभंग

 सोशल मीडियाचा विकृत चेहरा... इंस्टाग्रामचा नकार ठरला कारण.. तरुणीचा विनयभंग  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर ...

 सोशल मीडियाचा विकृत चेहरा... इंस्टाग्रामचा नकार ठरला कारण.. तरुणीचा विनयभंग 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि१६):-भिंगार कॅम्प स्टेशन हद्दीतील वाकोडी फाटा सोलापूर रोड परिसरात इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा राग मनात धरून एका २२ वर्षीय युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कॅम्प पोलिस स्टेशन, शिंगार येथे आरोपी अजय ठाणे आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना दि. १४/१२/२०२४ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वाकोडी फाटा, सोलापूर रोड येथे घडली. आरोपीने मोटारसायकलवरून तक्रारदार युवतीचा पाठलाग केला. आरोपी अजय ठाणे याने युवतीचा उजवा हात पकडला. त्याने तिचा पंजाबी ड्रेस फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यासोबतच आरोपींनी पीडित युवतीला शिवीगाळ करत ‘पाहून घेतो’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. युवतीने दि. १५/१२/२०२४ रोजी कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.असून, त्यावरून गुन्हा रजि. नं. ६८०/२०२४ भा. न्या. सं. च्या कलम ७४, ७८, १३६ (२), ३५१ (२)(३), ३५२, आणि ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रेवणनाथ मिसाळ अधिक तपास करत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments