साताऱ्यात क्लासमध्ये शिकवायला जाताना मॅडमचा भीषण अपघात, ट्रॅक्टर ट्रॉली चे चाक डोक्यावरून गेलं मॅडमला जागेवरच मृत्यूने गाठले कु: माधवी ग...
साताऱ्यात क्लासमध्ये शिकवायला जाताना मॅडमचा भीषण अपघात, ट्रॅक्टर ट्रॉली चे चाक डोक्यावरून गेलं मॅडमला जागेवरच मृत्यूने गाठले
कु: माधवी गिरी गोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा पुणे बेंगलोर महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट परिसरांत गुरुवारी दुपारी अंगाचा थरकाप उडवणारा अपघात झाला आहे. यामध्ये खाजगी क्लासमध्ये शिकवण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीचे डोक्यावरून गेल्याने एक विवाहित शिक्षिका जागीच ठार झाली तर दुसरी महिला जखमी झाली आहे. सौ. सारिका सुतार (रा. संगममाऊली सातारा) असे या मृत विवाहित शिक्षिका मॅडमचे नाव आहे. तर ईश्वरी सुतार असे या जखमी महिलेचे नाव आहे. या भीषण अपघातानंतर साताऱ्यात एकच खळबळ उडाली होती. मिळालेल्या अधिक माहितीवरून बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून अंजठा चौकाच्या दिशेने दोन महिला आपल्या दुचाकीवरून जात होत्या त्याचवेळी अंजठा चौकातून उसाचा ट्रॅक्टर आला सर्व्हिस रोडवर येण्यासाठी क्रेटा कार अचानक पुढे आली. त्या कारला चुकवताना चालकांने अचानक ट्रॅक्टर उजवीकडे वळवला. त्यामुळे समोरून येणारी दुचाकी ही मोठ्या खड्ड्यात आदळली त्या धक्क्याने दुचाकी वर मागे बसलेल्या सो सारिका सुतार या खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर ट्रॉलीचे मागील चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर दुसरी महिलाही जखमी झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, पाहणाऱ्यांना प्रत्यक्षदर्शीचा अक्षरक्ष: थरकाप उडाला होता. सौ. सारिका सुतार या अजंठा चौकातील खाजगी क्लासमध्ये शिकवण्यासाठी जात होत्या. मात्र वाटेतच त्यांना मृत्यूने गाठले, या अपघात घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. या अपघातानंतर साताऱ्यात मोठी खळबळ उडाली होती.

No comments