adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डांभुर्णी येथे "स्थानिक भूजल मुद्दे आणि भूजल प्रबंधन " या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम

 डांभुर्णी येथे "स्थानिक भूजल मुद्दे आणि भूजल प्रबंधन " या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  (सं...

 डांभुर्णी येथे "स्थानिक भूजल मुद्दे आणि भूजल प्रबंधन " या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 भारत सरकार जलशक्ति मंत्रालय जलसंधारण नदी विकास व गंगा संरक्षण विभागाच्या अधिनस्त कार्यालयाकडून केंद्रीय भूमिजल बोर्ड (मध्य क्षेत्र) नागपूर  च्या वतीने  तालुक्यातील डांभुर्णी येथील डॉ.दिवाकर खंडू चौधरी विद्यालयात "स्थानिक भूजल मुद्दे आणि भूजल प्रबंधन " या विषयावर  12 डिसेंबर रोजी एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय भूमिजल बोर्ड नागपूरचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि नोडल अधिकारी एस. एस. पूर्ती यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे उद्घाटन यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. 

भारत सरकार जलशक्ति मंत्रालय जलसंसाधन नदी विकास व गंगा संरक्षण विभागाचे अधिनस्त कार्यालयाकडून केंद्रीय भूमिजल बोर्ड (मध्य क्षेत्र) नागपूर  च्या वतीने  तालुक्यातील डांभुर्णी येथील डॉ.दिवाकर खंडू चौधरी विद्यालयात "स्थानिक भूजल मुद्दे आणि भूजल प्रबंधन " या विषयावर  12 डिसेंबर रोजी एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय भूमिजल बोर्ड नागपूर आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था जळगाव येथील अधिकाऱ्यांनी स्थानिक भूजल समस्या शाश्वत भूजल व्यवस्थापन, ग्रामीण स्तरावर पाण्याचा ताळेबंद, कृत्रिम भूजल पुनर्भरण  तंत्रज्ञान तसेच पी आय बी प्रकल्पाविषयी समुदाय आधारित जलसंधारण पद्धतीवर  सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी गावात   सुरू असलेल्या पिझोमीटर विहिरीला पीआयबी ड  भेट दिली. पिझोमीटर विहीर बांधणी , डिजिटल भूजल पातळी रेकॉर्डर बसविण्याची प्रक्रिया आणि भूजल निरीक्षणातील त्यांचे महत्त्व याबद्दल शेतकरी बांधवांना  सविस्तर माहिती दिली . कार्यक्रमाची रूपरेषा व महत्व नागपूरच्या वरिष्ठ वैज्ञानिक प्रीती राऊत यांनी तर समालोचन संकेत थोटे  यांनी केले.कार्यक्रमास सरपंच कल्पना बाविस्कर उपसरपंच पुरुषी चौधरी पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था जळगाव चे वरिष्ठ भूवैज्ञानिक सुधीर जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षक ग्रामपंचायत सदस्य पाणी समितीतील सदस्य महिला शेतकरी मोठ्या संख्येने या प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित होते .

No comments