साकळी येथील श्री गजानन महाराज मंदिरातील आकर्षक मुर्ती. साकळी ते शेगाव ४ जानेवारीला पदयात्रा, श्री. गजानन महाराज फाऊंडेशनतर्फे आयोजन भरत...
साकळी येथील श्री गजानन महाराज मंदिरातील आकर्षक मुर्ती.
साकळी ते शेगाव ४ जानेवारीला पदयात्रा, श्री. गजानन महाराज फाऊंडेशनतर्फे आयोजन
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : साकळी येथील श्री. सच्चिदस्वरुप बहूउद्देशिय संस्था संचलीत श्री. गजानन महाराज फाऊंडेशनतर्फे साकळी ते शेगाव पदयात्रेचे आयोजन ४ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. साकळी ते शेगाव पदयात्रेचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. साकळी, यावल व परिसरातील तब्बल १२५ भाविक पदयात्रेत सहभागी होणार आहेत. या पदयात्रेसाठी भाविकांची नावनोंदणी सुरु करण्यात आली आहे.
साकळी ता. यावल येथील मनवेलरोड वरील जोशी फार्म मधील श्री. गजानन महाराज देवस्थानातून ४ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता सुरुवात होईल. पदयात्रेचा भुसावळ, मुक्ताईनगर, वडनेर भोलजी व खामगाव येथे मुक्काम राहिल. पदयात्रेत दररोज पहाटे पाच वाजता काकडा आरती, सकाळी ११ वाजता श्रींची महाआरती, सायंकाळी साडेपाच वाजता हरिपाठ, सायंकाळी सात वाजता शेजारती आदी नित्योपासना होतील. साकळी ते शेगाव पदयात्रेचे साकळी गावात यंदाही जल्लोषात स्वागत केले जाईल. लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील व मान्यवरांच्या यांच्या हस्ते मुख्य चौकात पूजन होऊन पदयात्रेचे स्वागत होईल. यासह गावात विविध भागांमध्ये श्रींच्या रथावर फुलांची उधळण करुन स्वागत केले जाईल. टाळ मृदंगाच्या गजरात पदयात्रा शेगावकडे रवाना होणार आहे. येथून पदयात्रा शिरसाड मार्गे भुसावळकडे प्रयाण करेल. पदयात्रेत सहभागासाठी नाव नोंदणी अत्यावश्यक राहणार असल्याने परिसरातील भाविकांनी नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी श्री. गजानन महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, खजीनदार वासुदेव मोते, कार्याध्यक्ष हर्षल बाविस्कर, सहखजीनदार मुकेश बोरसे, जेष्ठ सदस्य जगदीश चौधरी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा उपाध्यक्ष जगदीश मराठे आदींशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
----- -
८ रोजी शेगावी पोहचणार
४ जानेवारी रोजी साकळी येथून प्रस्तान केलेली पदयात्रा ८ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पदयात्रा शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात पोहचेल. या ठिकाणी श्री. गजानन महाराज संस्थानतर्फे रथाचे स्वागत होऊन पदयात्रेकरुना प्रसाद वितरण केले जाईल. श्रींच्या दर्शनानंतर पदयात्रेकरु रवाना होतील.

No comments