जे.ई.स्कूल, मुक्ताईनगरची शैक्षणिक सहल यशस्वी प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसाय...
जे.ई.स्कूल, मुक्ताईनगरची शैक्षणिक सहल यशस्वी
प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जे.ई.स्कूल ची दिनांक 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.मोरगाव, जेजुरी,नारायणपूर,प्रति बालाजी, आळंदी, लेण्याद्री, शिवनेरी, ओझर,शिर्डी या ठिकाणी नेण्याचे आयोजिले होते. विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, संस्कृती व कला यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा. या हेतूने नियोजन करून राबविण्यात आली. ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाणांना भेट देण्यात आली. सहलीच्या बसचे पूजन मुख्याध्यापक श्री. व्ही.एम.चौधरी यांच्या उपस्थितीत करून रवाना झाली. शैक्षणिक सहलीसाठी श्री.बी.पी.लोखंडे, श्री आर.एन. बढे, श्री एस.एस. धनके, श्रीमती ए.डी.भोळे यांनी सहकार्य करून सहल यशस्वीपणे पार पाडली. तर एस.टी. महामंडळाचे चालक श्री.एस.पी.नारखेडे यांनी सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक सेवा पुरवली.

No comments