प्रभू येशूंच्या प्रेमाचा संदेश देत फिलादेल्फीया चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव उत्साहात साजरा.. प्रभू येशूच्या जन्मामुळे संपूर्ण मानवजातीचा उद...
प्रभू येशूंच्या प्रेमाचा संदेश देत फिलादेल्फीया चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव उत्साहात साजरा.. प्रभू येशूच्या जन्मामुळे संपूर्ण मानवजातीचा उद्धार झाला-फादर रेव्ह.दीपक दुसाने
सचिन मोकळं अहिल्यानगर/(पुणे)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे :-आज दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी फिलादेल्फीया ख्रिस्त मंडळी (चर्च) येथे ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने व आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पवित्र प्रसंगी चर्चमध्ये विशेष प्रार्थना,उपदेश, गीतगायन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चर्चचे फादर रेव्ह.दीपक दुसाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रभू येशू ख्रिस्त यांनी या जगात मानव रूपात अवतार घेऊन कुमारी मरियाच्या पोटी जन्म घेतला.त्यांच्या जन्मामुळे संपूर्ण मानवजातीचा उद्धार झाला असून प्रेम,क्षमा, शांती व बंधुतेचा संदेश त्यांनी दिला आहे.” त्यांच्या या उपदेशाने उपस्थित भक्तगण भावूक झाले.
या प्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर वैशालीताई सुनील बनकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनीलदादा बनकर यांनी चर्चला सदिच्छा भेट देत सर्व सभासदांना ख्रिसमसच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.त्यांनी ख्रिस्ती समाजाच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले.ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त चर्चमधील तरुण व बालचमूंनी ख्रिसमसची गीतं गात,नृत्य सादर करत आनंदोत्सव साजरा केला.संपूर्ण परिसरात आनंद,उत्साह व भक्तिभावाचे वातावरण पसरले होते.फिलादेल्फीया चर्चची स्थापना २००६ साली करण्यात आली असून,तेव्हापासून हे चर्च बंटर शाळा परिसरातील जुन्या चर्चमध्ये नियमितपणे भरत आहे. ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमांसाठी हे चर्च एक महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी सामुदायिक जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.प्रेम,ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देत हा ख्रिस्त जन्मोत्सव अत्यंत शांततामय व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.


No comments