तब्बल आठ महिनाभर बंद पडलेल्या वारसविहीर एसटी बस सेवा अखेर पुन्हा सुरू प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) त्र्...
तब्बल आठ महिनाभर बंद पडलेल्या वारसविहीर एसटी बस सेवा अखेर पुन्हा सुरू
प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वारसविहीर एसटी बस आठ ते नऊ महिन्यांपासून बंद होती वृत्त नेशन महाराष्ट्रमध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली होती वृत्ताची एसटी महामंडळ प्रशासनाने याची दखल घेतली आणि 1 डिसेंबर 2025 रोजी बस सुरू करण्यात आली आहे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे
बस बंद होती तेव्हा प्रवास करणाऱ्या नागरिकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे गैरसोय होत होते एसटी महामंडळाने लवकरात लवकर एसटी बस सुरू करावी अशी मागणी पूर्व विभागातील हेदुलीपाडा,नांदगाव कोहोळी, वारसविहीर,खरवळ येथील नागरिकांनी केली होती
हेदुलीपाडा,नांदगाव कोहोळी, वारसविहीर, खरवळ मार्गे एसटी बस सेवा बंद होती त्यामुळे नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येत होत्या शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करून व मिळेल त्या खाजगी वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे शिक्षण घेण्यासाठी यावे लागत होते तसेच जेष्ठ नागरिकांना कामानिमित्त त्रंबकेश्वर प्रवास करावा लागत होते एसटी बस नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. तसेच आजारी गरीब रुग्णांना खाजगी व सरकारी दवाखान्यात वेळेत पोहोचता येत नव्हते शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते,औषधे खरेदी करण्यासाठी व बँकेत कामानिमित्त त्र्यंबकेश्वर बाजारपेठेत यावे लागत आहे.
वेळुंजे ते खरवळ रस्त्याचे व फुलाचे काम सुरू होते व रस्ता खराब व अरुंद असल्याने महामंडळाने एसटी बस बंद करण्यात आली होती. अखेर नऊ महिन्यानंतर एसटी बस सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या मनात आनंद व्यक्त होत आहे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती ती आता दूर झालेली आहे. एसटी बस सेवा चालू करण्यासाठी मोलाचे सहकार्य हेदुलीपाड्यातील सामाजिक कार्यकर्ते नांदगावकोहोळीचे सरपंच वारसवीरचे सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून वेळोवेळी एसटी महामंडळ अधिकारी यांना भेटून पत्र्यावर करून व रस्त्याची अडचण होती ती उभे राहून करून घेऊन एसटी बस सुरळीतपणे चालू झालेली आहे.


No comments