adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगरपालिका निवडणूक EVM सुरक्षिततेसाठी शिंदे गटातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवाराचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 चोपडा नगरपालिका निवडणूक EVM सुरक्षिततेसाठी शिंदे गटातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवाराचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याक...

 चोपडा नगरपालिका निवडणूक EVM सुरक्षिततेसाठी शिंदे गटातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवाराचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे मतदान दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी झाले. मतमोजणीची मूळ तारीख ३ डिसेंबर २०२५ होती परंतु माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या विलंबित काळात स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेल्या ईव्हीएम च्या सरक्षिततेसाठी अधिक बळकट तांत्रिक व कायदेशीर उपायांची आवश्यकता आहे.

शिवसेनेचे उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करून EVM सुरक्षिततेसाठी आवश्यक तांत्रिक साधने वापरण्याची मागणी केली आहे. त्यांनी Signal Jammer बसविणे, Strong Room चे 24×7 CCTV LIVE FEED उपलब्ध करून देणे, तसेच उमेदवारांना मोबाइलवरून Strong Room मॉनिटरिंगची परवानगी देण्याची मागणी केली आहे.


शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या नम्रता सचिन पाटील यांनी सांगितले की जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी चोपड्यात आले असताना देखील त्यांनी स्ट्रॉंग रूमला भेट दिली नाही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी शहर पोलीस स्टेशन वरून परस्पर निघून गेल्याने शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नम्रता पाटील व नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.पोलीस अधीक्षकांनी का स्ट्रॉंग रूमला भेट दिली नाही याच्यावरून उमेदवारांनी निवडणूक आयोगाला निवेदन देऊन EVM सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.निवेदन सादर करतेवेळी शिवसेना (शिंदेगटाचे) उमेदवार पुंडलिक दीपचंद माळी,दिपाली विनोद चव्हाण,शेख आसिफ शेख सिद्धकी,ईश्वर युवराज अलकरी,आकाश सोपान पाटील,फरमान अली सय्यद अली,राजेंद्र हिरालाल पाटील, सुनील राजेंद्र पाटील,रवींद्र बळीराम पाटील,सागर सुनील चौधरी,निलेश अरुण बडगुजर,हिमांशू धर्मेंद्र महाजन,सचिन रवींद्र पाटील,अक्षय रविदास पाटील,अभय देविदास पाटील,सुमित दिलीप पाटील,अमोल साहेबराव पाटील, मयूर चंद्रकांत पाटील,मुख्तार सरदार,निलेश दत्तात्रय बारी, राहुल ज्ञानेश्वर चौधरी, दिनेश मनिलाल देशमुख, वरून किशोर चौधरी, मधुसूदन लहानु बाविस्कर,कुलदीप पंकज पाटील, अनुप प्रकाश जैन, रमाकांत नथू ठाकूर, नसीमबानू जाहिरीदीन जहागीर,हुसेन खा अयुब खा आदी उपस्थित होते.

No comments