आज श्री.शिवाजी आदर्श प्राथमिक शाळा हातेड येथे मा.सो.श्री.सुनिल दादा पाटील जि.प सदस्य यांच्या स्व खर्चातून उपमुख्यमंत्री मा.सो अजित दादा पवार...
आज श्री.शिवाजी आदर्श प्राथमिक शाळा हातेड येथे मा.सो.श्री.सुनिल दादा पाटील जि.प सदस्य यांच्या स्व खर्चातून उपमुख्यमंत्री मा.सो अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी ना वाॅटर बाॅटल भेट
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दिनांक ६ डिसेंबर रोजी हातेड बु, हातेड खु, गलवाडे ह्या संयुक्त जि. प. प्राथमिक शाळा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार अजित दादा पवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुनिल पाटील (वाळकी चोपडा )मा. जि. प. सदस्य ह्यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना घरुन शुध्द व थंड पिण्याचे पाणी आणता यावे म्हणुन पाण्याच्या बाटल्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तसेच महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या महापरीनिर्वान दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पाजंली अर्पण करण्यात आली. तसेच रंगोत्सव ह्या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना मिळावी ह्या उद्देशाने राष्ट्रीय पातळीवरच्या आयोजित स्पर्धेत बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना चषक व प्रमाण पत्र तसेच शाळेस मिळालेल्या चषक प्रदान करन्यात आले. ह्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सुनिल पाटील (वाळकी, चोपडा )मा. जि. प. सदस्य, सुतगिरणीचे संचालक बापुसाहेब देविदास सोनवणे चोपडा तालुका पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष बापुसाहेब पांडुरंग वंजी सोनवणे, हातेड सरपंच रावसाहेब संदिप सोनवणे, सुतगिरणी संचालक चंद्रकांत पाटील, शेतकी संघ संचालक श्री प्रभाकर सोनवणे,श्री. सुनिल बाविस्कर उपसरपंच राम दादा सनेर,मा. बाळुभाऊ पावनकर, सतिष सोनवणे, निलेश भाऊ Spend खु.,सोमनाथ भिल्ल, मुकेश पाटील, दिपक भाऊ घुमावल, अतुल सोनवणे, विकी सोनवणे, अजय सोनवणे,निलेश सनेर मुख्याध्यापक श्री. बोरसे सर, आहीरे सर, रेखा पाटील मँडम, अमृत पाटील सर, पवार मँडम, खैरनार सर, सनेर सर, शिंदे मँडम आदी उपस्थित होते



No comments