श्री अनंतराव सराफ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चित्रकला परीक्षेत 100 टक्के यशाची परंपरा ठेवली कायम.... अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हे...
श्री अनंतराव सराफ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चित्रकला परीक्षेत 100 टक्के यशाची परंपरा ठेवली कायम....
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नुकताच शासकीय चित्रकला परीक्षा म्हणजे एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा 2025 चित्रकला परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून श्री अनंतराव सराफ विद्यालय, शेलापूर येथिल विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे 100 टक्के यशाची परंपरा कायम ठेतली आहे. सविस्तर असे की, या परीक्षांचे महत्व लक्षात घेता 2025-26 हया शैक्षणिक वर्षात विद्यालयातील दोन्ही परीक्षांमध्ये एकूण 55 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या पैकी अ श्रेणीमध्ये 10, ब श्रेणी मध्ये 13 तर क श्रेणी मध्ये 32 विद्यार्थी उत्तीर्ण होत 100 टक्के यशाची परंपरा टिकविली आहे.
दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षे मधील मिळवणारे ग्रेड (श्रेणी) अ, ब, क असल्यास एस.एस.सी. परीक्षे मध्ये अनुक्रमे 7, 5, 3 असे एस एस. सी. बोर्डा कडून विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण म्हणून देण्यात येतात. विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. पी. सपकाळे, पर्यवेक्षक एस.आर सावळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक एन.जी, इंगळे यांचे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. परागदादा सराफ, संचालक मा. श्रीपाद्दादा सराफ, मा.पांडुरंग भोपळे, मा. आत्माराम सावळे यांनी कौतुक केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक बंधु भगीनी, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अटल टिंकरिंग लॅबचे संचालक वाय् आर जैस्वाल सर यांनी केले.

No comments