भीम आर्मीच्या आक्रमक भूमिकेमुळेच; लोणी ग्रामपंचायतीत चौकशी समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा...
भीम आर्मीच्या आक्रमक भूमिकेमुळेच; लोणी ग्रामपंचायतीत चौकशी समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील लोणी (ता.चोपडा) ग्रामपंचायतीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जाची दखल घेत पंचायत समिती, चोपडा यांच्या वतीने चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष ठिकाणी चौकशी करण्याचे आदेश पंचायत समिती कार्यालयाने दिले आहेत. सांगवी बु!!ता. यावल येथील आयु. राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर, मुबारक तडवी तालुका अध्यक्ष भीम आर्मी चोपडा, यांनी ग्रामसेवकांच्या कार्यकाळातील कामकाजाबाबत तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार अर्ज पंचायत समिती कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी यांनी दिले.
या चौकशीसाठी गठित करण्यात आलेल्या समितीत विस्तार अधिकारी (ग्राम), विस्तार अधिकारी (कृषी), शाखा अभियंता (बांधकाम) तसेच कनिष्ठ लेखाधिकारी यांचा समावेश आहे. सदर समितीने दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता लोणी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष चौकशी केली.
या चौकशीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून असून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे. भीम आर्मी भारत एकता मिशनच्या आक्रमक भूमिकेमुळेच या प्रकरणी चौकशी समिती गठित करण्यात आली असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष तपासणी सुरू असली तरी दोषींवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका भीम आर्मीने जाहीर केली आहे. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. हा लढा शांततेच्या मार्गाने, मात्र क्रांतिकारक पद्धतीने लढला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कारवाई न झाल्यास 26जानेवारी रोजी आमरण उपोषण केले जाणार. आयु. राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर (भीम आर्मी भारत एकता मिशन, जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख)

No comments