लोणवडी येथे 16 जानेवारी पासून श्रीराम चरीत मानस कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आरंभ अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
लोणवडी येथे 16 जानेवारी पासून श्रीराम चरीत मानस कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आरंभ
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- श्रीक्षेत्र लोणवडी येथे सालाबादाप्रमाणे श्री भगवंताच्या कृपेने व संत मुक्ताईच्या आशिर्वादाने आणि जनता जनार्दनाच्या सहकार्याने दि.16 जानेवारी 2026 शुक्रवार पासून श्रीराम चरित मानस कथेचे आयोजन करण्यात आले
कथा वाचक,रामायणचार्य ह.भ.प.श्री मंगेश महाराज दाताळकर यांचे असून प्रास्ताविक कीर्तन गुरुवार 15/01/2026 ह.भ.प.श्री पंढरीनाथ महाराज यांचे राहील आरंभ शुक्रवार दि.16/01/2026 ह.भ.प.श्री सौरभ महाराज जाधव नाशिक, शनिवार दि.17/01/2026 ह.भ.प.श्री पंकज महाराज पवार आळंदी,रविवार दि.18/01/2026 ह.भ.प.श्री परमेश्वर महाराज उगले,सोमवार दि.19/01/2026 ह.भ.प.श्री भरत महाराज चौधरी म्हैसवाडी, मंगळवार दि.20/01/2026 ह.भ.प.श्री दिनानाथ महाराज सावंत नाशिक,बुधवार दि.21/01/2026 ह.भ.प.श्री विष्णू महाराज गोंडे आळंदी,गुरुवार 22/01/2026 ह.भ.प.श्री मंगेश महाराज दाताळकर,शुक्रवार 23/01/2026 ह.भ.प.श्री रमेश महाराज आडविहिरकर यांचे असून गुरुवार दि.22/01/2026 रोजी दिंडी सोहळा व सांगता शुक्रवार दि.23/01/2026 राहील ऑक्टोपॅड वादक श्री ज्ञानेश्वर माऊली धनभर,तबला वादक रविदादा मानकर, की बोर्ड वादक श्री प्रवीणदादा राऊत,झाकी श्री विशालदादा चांदूरकर,काकडा व हरीपाठ ह.भ.प.श्री पंढरीनाथ महाराज कोऱ्हाडा, श्री रामभाऊ बोंडे तळणी,श्री अक्षय इंगळे तळणी,श्री लक्ष्मण झाल्टे धुपेश्वर, तर दुधलगाव,निपाना,शेलगाव बाजार,वाकडी,निंभारी,शिरढोण, जांभुळद्याबा व पंचक्रोशीतील समस्त टाळकरी व लोणवडी गावातील नागरिकांचे विशेष सहकार्य असून सर्व कार्यक्रम नादब्रह्म you tub चॅनलला कायमस्वरुपी असेल.


No comments