मुस्लिम बहुल वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्किंग व अतिक्रमणबाबत कारवाईची मागणी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत ग...
मुस्लिम बहुल वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्किंग व अतिक्रमणबाबत कारवाईची मागणी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:तहसील चौक ते पारपेठ भागाला जोडणाऱ्या रस्तावर व उडडाण पुलावर बेशिस्त वाहन पार्कींग व अतिक्रमणामुळे पारपेट भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने असगर कुरैशी व जफर खान यांच्या नेतृत्वात सदर रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे व बेशिस्त वाहन पार्किंग वर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन,ठाणेदार गणेश गिरी, मुखाधिकारी संजय केदार यांना अन्यायग्रस्त जनतेचे व्यासपीठ या संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.यावेळी इमरान लकी,मुबाशिर भाई,उर्फ बबलू,इमरान शेख,सुलेमान खान,सत्तार शाह या मुस्लिम सामाजिक घटकांनी महत्वपूर्ण पुढाकार घेतला होता.
निवेदनात म्हटले आहे की,परिसरात जि.प.शाळा,क्रीडा संकुल,रेल्वे स्टेशन, एसडीओ कार्यालय,पंचायत समिती,मुक्ताईनगर महामार्ग,मोठे व्यापारी केंद्र,आठवड्याचा बाजार,हिंदू स्मशानभूमी याच मार्गावर आहेत.त्याचमुळे हा रस्ता वर्दळीचा असल्याचे बहुदा दिसून येते.गेल्या काही दिवसापूर्वीच शाळकरी अल्पवयीन विद्यार्थिनींच्या अपहरण,एका अज्ञात टिप्पर कडून एकाची तर दुसऱ्या एका म्हातार्याची याच परिसरात अपघातात मृत्यू झाल्याची घटना लक्षात घेता. तात्काळ अतिक्रमण दुर करत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून उपायोजना होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
कायमस्वरूपी उपाय योजना म्हणून तात्काळ मुक्ताईनगर रोडवर बेशिस्तपणे उभे राहणारे मोठे अवजड वाहने हटवणे व कारवाई करणे,चारखंबा चौक ते वल्ली चौक परिसरात अवैध लाकूड साठा जप्त करून रस्ता मोकळा करणे,वल्ली चौक पारपेठला जोडणाऱ्या उड्डाण पुलावरील अतिक्रमण हटवून बेशिस्त वाहन पार्किंगवर कारवाई करने अशा अनेक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.संघटनेकडून करण्यात आलेल्या मागण्यांचे स्वागत करत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन देण्याची प्रशासनाची भूमिका स्वागतार्ह ठरली. यावेळी संघटनेचे ॲड कृष्णा मेसरे,स्वप्नील आकोटकर,अमोल टप,पप्पू ठाकूर,प्रदिप इंगळे,रोहित डाके संजय तिवारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments